आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP, Congress, AAP Leaders Will Fly By Plane At A Cost Of Rs 100 Crore; Advance Booking Confirmed

गुजरात निवडणूक:100 कोटी रुपये खर्चून विमानाने उड्डाण करणार भाजप, काँग्रेस, आप नेते; आगाऊ बुकिंग निश्चित

अहमदाबाद / भाविन पटेल4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी या वेळी राजकीय पक्षांनी चार्टर्ड विमाने आणि हेलिकॉप्टरचे बंपर बुकिंग केले आहे. भाजप, काँग्रेस आणि आपच्या अॅडव्हान्स बुकिंगचा आकडा १०० कोटींपर्यंत पोहोचला आहे. सर्वाधिक बुकिंग भाजपने केले आहे. भाजपने गत निवडणुकीत २ चार्टर्ड आणि २ हेलिकॉप्टर बुक केले होते. या वेळी ३ चार्टर्ड आणि ४ हेलिकॉप्टर बुक केले आहेत. दिल्लीतून १-१ चार्टर्ड व हेलिकॉप्टर अहमदाबादेत दाखल झाले आहे.

काँग्रेसनेही १-१ चार्टर्ड प्लेन आणि हेलिकॉप्टर बुक केले आहे. आम आदमी पक्षाचे नेते दिल्लीतून चार्टर्ड घेऊन येतात. अहमदाबादेत अॅडव्हान्स बुकिंग होत नाही.सूत्रांनुसार जेट विमानांचे अॅडव्हान्स बुकिंग २ ते ४ लाख, टर्बो क्रॉप इंजिन असणाऱ्या विमानाचे १.४० लाख आणि ट्विन इंजिन हेलिकॉप्टरचे ३ तेे ३.७५ लाख रुपये प्रतितासाच्या हिशेबाने आहे. अहमदाबाद-मुंबई आणि दिल्लीपर्यंतच्या विमानसेवेसाठी प्रदाता कंपनीच्या हेलिकॉप्टर-चार्टर्डचे अॅडव्हान्स बुकिंग करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...