आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिशन इलेक्शन बळकट करण्याची तयारी:अॅपमध्ये सर्व कार्यकर्त्यांचा डेटा, यावर देणार भाजप-काँग्रेस टास्क

‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌रायपूर / अश्विनी पांडेय2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष टेक्नॉलॉजीला शस्त्र बनवू पाहत आहेत. यावर कामही सुरू झाले आहे. भाजप आपल्या पक्षाच्या सरल अॅपमध्ये देशभरातील कार्यकर्त्यांचा डाटा संग्रहित करत आहे, तर काँग्रेसही भारत जोडो यात्रेच्या अॅपला अद्ययावत करत आहे. येत्या काही महिन्यांत जेथे विधानसभा निवडणुका आहेत, तेथे भाजपने ऑगस्टपर्यंत सर्व मतदार यादी प्रभारींची नावे आणि क्रमांक सरल अॅपमध्ये जोडण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दोन्ही पक्ष या अॅपद्वारेच कार्यकर्त्यांना टास्क देतील.

भाजप : सरल अॅप आता अनेक विभाग, अॅक्सेस मर्यादित केले २०१७ मध्ये बनलेल्या सरल अॅपवर २०२२ मध्ये वेगाने काम केले जात आहे. गुजरात निवडणुकीत याचा वापर केला गेला. आता राज्यांना लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याचा डाटा संग्रहित करण्यास सांगितले गेले. यात अनेक विभाग बनवून अॅक्सेस मर्यादित करण्यात आले आहेत.

काँग्रेस : सर्वांचे व्हॉट्सअॅप नंबर लिंक होणार, चॅट रूमही असेल भारत जोडो यात्रेच्या अॅपवर पक्षाच्या आयटी टीमने काम सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत सेलला प्रशिक्षण दिले गेले. आता प्रत्येक राज्य अध्यक्षांना कार्यकर्त्यांचा डेटा संग्रहित करण्याची जबाबदारी दिली जाईल, जेणेकरून ते आपल्या कार्यकर्त्यांचा डेटा संग्रहित करू शकतील.