आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Criticizes Congress' 10 Promises Only Those With Credibility Can Guarantee: Shah

हिमाचल निवडणूक 2022:काँग्रेसच्या 10 आश्वासनांवर भाजपचे टीकास्त्र, ज्यांची विश्वासार्हता असते त्यांचीच हमी देता येते : शहा

सुलह (हिमाचल प्रदेश)5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी हिमाचल प्रदेशातील सुलह आणि पांवटा साहिब येथे रॅली काढली. ते म्हणाले की, काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर आई-मुलाचा पक्ष आहे आणि हिमाचलमध्येही तो आई-मुलाचाच पक्ष बनून राहिला आहे. येथे एकदा काँग्रेस आणि एकदा भाजप सत्तेत येते या मुद्यावर काँग्रेस मते मागत आहे.’ ते म्हणाले की, भाजपने हे समीकरण बदलले. मणिपूर, उत्तर प्रदेश, आसाममध्ये सलग दुसऱ्यांचा भाजपचे सरकार बनले. गुजरातेत तर सहाव्यांदा सत्तेत आहोत. आता हिमाचलची वेळ आहे.’ शहा म्हणाले की, काँग्रेस १० आश्वासने घेऊन फिरत आहे, मात्र ज्यांची विश्वासाहर्ता असते त्यांचीच हमी देता येते हे त्यांना माहीत नाही. त्यांच्या काळात १२ लाख कोटींचा घोटाळा झाला.’

तुष्टीकरणासाठी काँग्रेसने राम मंदिर बनू दिले नाही
शहा यांनी काँग्रेसवर तुष्टीकरणाचा आरोप करत राम मंदिर होऊ न दिल्याचे टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, काँग्रेस तेथे फोडा आणि राज्य करा, या धोरणानुसार काम करते. आम्ही दीर्घ काळापासून प्रलंबित हाटी समुदायास आरक्षण दिले. काँग्रेसने दलितांना नुकसान होईल, असा खोटा प्रचार केला. मोदी सरकारच्या काळात कलम ३७० संपुष्टात आले. अयोध्येत राम मंदिर होत आहे. दहशतवादावर सर्जिकल-एअर स्ट्राइक करण्यात आला. करतारपूर कॉरिडॉर बनला.गुजरातेत सोमनाथ मंदिर क्षेत्राचा विकास करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...