आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामेट्रोमॅन आणि केरळमधील भाजपचे उमेदवार ई. श्रीधरन यांनी, आपण सर्व मुद्द्यांवर पक्षाशी सहमत नाही, अशी कबुली दिली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटले की, ‘काही-काही मुद्द्यांवरील असहमती न पाहता आपल्याला समग्रपणे एखाद्या प्रकरणाकडे पाहावे लागेल.’ गेल्याच महिन्यात भाजपत प्रवेश केलेल्या ८८ वर्षीय श्रीधरन यांना पक्षाने पलक्कड मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे. चर्चेत लव्ह जिहादचा प्रश्न आला तेव्हा ते म्हणाले, ‘मी या विशिष्ट विषयावर बोलणार नाही. हा वादग्रस्त विषय आहे. मी पूर्णपणे सहमत होऊ शकत नाही. पण तुम्हाला समग्रपणे पाहावे लागेल.
आपल्याकडे (केरळमध्ये) भाजपसारखा पक्ष नसेल तर हे राज्य हातातून निघून जाईल. मोदी पंतप्रधान नसते तर जम्मू-काश्मीर आतापर्यंत हातातून गेले असते.’ काश्मीरमध्ये इंटरनेट बंद करण्याबाबत श्रीधरन म्हणाले, ‘हे फक्त छोटेसे बलिदान आहे, ते देशासाठी करावे लागते.’ राज्यात भाजप विकासाच्या मुद्द्यावर लढत आहे. या निवडणुकीनंतर राज्यात रालोआ सरकार स्थापन करेल, असा दावाही त्यांनी केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.