आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकमधील पराभवासोबतच भाजपच्या मिशन दक्षिणचा पाया डळमळला. दक्षिण भारतात लोकसभेच्या एकूण १३० जागा आहेत. भाजपकडे सध्या दक्षिणेत २९ खासदार आहेत. पक्षाने यंदा दक्षिण भारतात ६० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. परंतु कर्नाटकमधील विजयाने त्याला धक्का बसला आहे. दक्षिणेकडील राज्यांत मुरब्बी नेत्यांचा अभाव अाहे. याच समस्येशी भाजप झुंज देत असतानाच पक्षासमोर लोकसभा निवडणुकीचेही आव्हान आहे. स्थानिक नेतृत्वाबाबत साशंकता असलेल्या राज्यांत पक्षाची कामगिरी कमकुवत असते, असे पक्षाचे वरिष्ठ नेते स्वीकारतात. या निवडणुकीनंतर मध्य प्रदेश, राजस्थानात नेतृत्वावरून संभ्रम दूर झाला नाहीतर पक्षाला फटका बसू शकतो. काँग्रेसकडे मात्र छत्तीसगडमध्येही नेतृत्वावरून काहीही संभ्रम नाही. त्याचा काँग्रेसला लाभ होऊ शकतो. तिरंगी मुकाबल्यात आतापर्यंत भाजपचा मतांचा टक्का वाढला आहे. परंतु कर्नाटकात पहिल्यांदाच ही परंपरा खंडित झाली. कारण दक्षिणेकडील राज्यांत काँग्रेस कर्नाटक व केरळमध्ये देखील बळकट स्थितीत आहे.
दिव्य मराठी एक्सप्लेनर
कर्नाटकमध्ये पराभवाचे सर्वात मोठे कारण काय वाटते?
भाजपसाठी सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे दक्षिण भारतीय राज्यात पक्षाकडे कोणताही दिग्गज नेता नाही. येदियुरप्पांच्या रूपात एकमेव मजबूत नेता कर्नाटकमध्ये पक्षाकडे आहे. मात्र त्यांनी सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरीत भाजपकडे स्थापित किंवा चमत्कारी नेता नसणे मोठी समस्या आहे.
या निकालाचा लोकसभा निवडणुकीवर काय परिणाम?
निवडणूक आयोगाच्या आकड्यांवरून कर्नाटक निकालाचे आकलन लोकसभेच्या जागांच्या हिशेबाने केल्यास भाजपला १८ लोकसभा जागांचे नुकसान होऊ शकते. तथाप, लोकसभा आणि विधानसभा निवडणुका वेगळ्या मुद्द्यांवर होतात. पण ज्या जागांवर भाजप जास्त फरकाने पराभूत झाला तेथे भाजपची चिंता वाढू शकते.
डबल इंजिन सरकार कार्ड निकामी झाल्याने काय होईल?
हिमाचल प्रदेशनंतर कर्नाटकमध्येही डबल इंजिन आणि हिंदुत्वाची घोषणा निकामी ठरली. त्यामुळे मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणसारख्या राज्यांत ही घोषणा चपखल बसेल, याबाबत भाजपमध्ये एकमत बनणे कठीण जाणार आहे.
जातीय समीकरणे साध्य करण्याच्या प्रयत्नांचे परिणाम काय?
केंद्र आणि कर्नाटक सरकार दलित, ओबीसी आणि आदिवासी समुदायाच्या कल्याणासाठी स्वत:ला समर्पित असल्याचे सांगत राहिले, परंतु कर्नाटकात भाजपला याचा विशेष फायदा झाला नाही. कर्नाटक निवडणुकीत मंडलना (वोक्कालिग्गा आणि लिंगायत) २-२% आरक्षण देण्याचा मुद्दाही चालला नाही. सोबतच कमंडलचा (बजरंगबली) मुद्दाही चालला नाही. मिशन दक्षिणसाठी आता भाजपकडे हेच हत्यार होते, जे आता बोथट झाले आहे.
काँग्रेसला हा निकाल कसा फायदा देऊ शकतो ?
काँग्रेसचे नवीन अध्यक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्वावर मोहोर लागणे हे पक्षाला सर्वात मोठा दिलासा देणारे ठरले आहे. याचा परिणाम असा होईल की, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसारख्या आगामी विधानसभा निवडणुकीत पक्ष अधिक आत्मविश्वासाने उतरेल.
कर्नाटक निवडणुकीत भाजपची सर्वात मोठी चिंता कोणती?
भाजपचा नेहमीच आपल्या मूळ मतपेढीवर प्रचंड विश्वास राहिला आहे. पण कर्नाटकात भाजपची कोअर व्होट बँक (लिंगायत) तुटली. कित्तूर कर्नाटक (मुंबई-कर्नाटक) जेथे लिंगायत मोठ्या संख्येने आहेत, तेथे भाजपला धक्का बसला आहे. अनेक जागा गमवाव्या लागल्या.
अल्पसंख्याकांबाबतच्या रणनीतीत कुठे चूक झाली?
स्नेहमिलन आणि अन्य कार्यक्रमांद्वारे भाजपने अल्पसंख्याकांत (मुस्लिम) मिसळण्याचा भाजपने प्रयत्न केला. गेल्या वर्षी हैदराबादच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत याचा प्रस्तावही भाजपने पारित केला होता. त्यानंतरही कर्नाटक निवडणुकीच्या निकालांनी हे सिद्ध केले आहे की भाजप अल्पसंख्याकांसाठी केवळ अस्पृश्य राहिलेला नाही तर अल्पसंख्याक एकजुटीने भाजपच्या विरोधात मतदान करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.