आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभा रणनीतीवर चर्चा होणार:आरएसएसच्या फीडबॅकबाबत भाजप सरचिटणीसांची आठवड्यात बैठक

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीतून मिळालेल्या फीडबॅकबाबत भाजप सरचिटणीसांची याच आठवड्यात बैठक होणार आहे. यामध्ये पक्षाध्यक्ष जेपी नड्डा येत्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या रणनीतीबाबत चर्चा करतील. संघाची प्रतिनिधी सभा हरियाणातील पानिपतमध्ये सुरू आहे. यामध्ये संघाशी संबंधित ३४ संघटनांचा समावेश आहे. सूत्रांनुसार, संघाशी जोडलेले लोक एका वर्षापासून देशभरात सामान्य लोकांशी संवाद साधत आहेत. यामुळे लोकांच्या अपेक्षा आणि तक्रारी संघाला कळत आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले, महत्त्वाच्या मुद्द्यावर संघाचा फीडबॅक महत्त्वाचा आहे.

बातम्या आणखी आहेत...