आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Government In Maharashtra | Narayan Rane | Marathi News | Narayan Rane Claims BJP Will Rule Maharashtra By March Latest News And Updates

केंद्रीय मंत्र्यांचा दावा:राज्यात मार्च पर्यंत भाजपची सत्ता येणार! महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही, नारायण राणे यांचा दावा

जयपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनंतर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यात भाजप सत्तेत येणार असल्याचा दावा केला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मते, महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. येत्या मार्च पर्यंत महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार आहे.

मार्च पर्यंत राज्यात भाजपची सत्ता येणार आहे. त्यानंतर तुम्हाला अपेक्षित बदल दिसायला लागतील. सरकार पाडणे असो वा सरकार स्थापित करणे... या सर्व गोष्टी खूप सीक्रेट असतात. तरीही ही माझ्या मनातली गोष्ट असल्याने ती मी तुमच्यासमोर मांडत आहे. असे नारायण राणे म्हणाले आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे विधान केले होते. त्यांचा उल्लेख करताना नारायण राणे म्हणाले, की मार्च पर्यंत राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. हीच गोष्ट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही काम करणार आहोत. यासोबतच, उद्धव ठाकरेंवर बोलताना त्यांनी काहीही बोलण्यास टाळले. त्यांची (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) तब्येत ठीक नाही. मी त्यावर काहीही बोलणार नाही. परंतु, महाविकास आघाडी सरकार जास्त दिवस टिकणार नाही असे नारायण राणेंनी सांगितले आहे.

राउत आणि पवारांनी घेतला होता चिमटा
चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच राज्यात भाजपची सत्ता येणार असे विधान केले होते. त्यावर शिवसेना खासदार संजय राउत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिमटा घेतला होता. "पहाटेच्या शपथविधी'ला (देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी) आता दोन वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच शपथविधीचा झटका कदाचित चंद्रकांत पाटील यांना लागत असेल. यापूर्वीही त्यांनी 28 वेळा भाजपची सत्ता येणार असे भाकित केले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांनी असली विधाने करावी लागतात." असे राउत म्हणाले.

तर पाटील यांना आता काही काम उरलेले नाही. म्हणून त्यांनी भाकिते वर्तवण्याचा नवीन व्यवसाय सुरू केला असावा. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पुढील 5 वर्षे टिकणार असे शरद पवार यांनी नुकतेच स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...