आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bjp Gujarat Model Vs Rajasthan | New Strategy | Narendra Modi Amit Shah | Rajasthan News

BJP राजस्थानात 40 MLAचे तिकीट कापणार:100 नव्या चेहऱ्यांना देणार संधी, गुजरात फॉर्म्युला होणार लागू; वाचा 6 मोठी आव्हाने

जयपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप गुजरातमधील ऐतिहासिक विजयाचा फॉर्म्युला राजस्थानात लागू करणार आहे. या फॉर्म्युल्यामुळे नेत्यांच्या काळजाची धडधड वाढली आहे. भाजपने विद्यमान 71 पैकी 40 आमदारांचे तिकीट कापण्याचा व 200 पैकी 100 जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे येथील अनेक बड्या चेहऱ्यांना आगामी निवडणुकीत संधी मिळणार नसल्याचा दावा केला जात आहे. गुजरातमध्ये माजी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली होती.

पुढील वर्षाच्या अखेरीस म्हणजे डिसेंबर 2023 मध्ये राजस्थानात विधानसभा निवडणुकीचा फड रंगणार आहे. या निवडणुकीचा 2024 च्या लोकसभा निवडणुकीत थेट परिणाम पडेल. त्यामुळे भाजपला गुजरातच्या विजयाची राजस्थानात पुनरावृत्ती करता येईल काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भाजपचे सर्वच नेते व कार्यकर्ते गुजरात मॉडल राजस्थानात राबवण्याची मागणी करत आहेत. पार्टी गुजरात मॉडल सत्तेत परतण्याची शिडी असल्याचे मानते. त्यामुळे चला तर मग पाहूया अखेरीस काय आहे भाजपचे गुजरात मॉडल व ते राजस्थानात लागू करण्यात कोणती आव्हाने आहेत?

दिव्य मराठीने भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसह राजकीय तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यात राजस्थानात गुजरात मॉडल लागू करण्यासाठी भाजपला मोठे कष्ट घ्यावे लागतील, एवढेच नाही तर विद्यमान रस्सीखेचीवर यशस्वी उपाय शोधून सत्तेत पुनरागमन करण्यासाठी एक प्रभावी कार्ययोजना तयार करावी लागेल, असे निष्पन्न झाले.

प्रथम पाहूया भाजपचे गुजरात मॉडल

गुजरातमध्ये भाजपची 27 वर्षांपासून सत्ता आहे. यंदा ते 7 व्यांदा सत्तेत आलेत. आपल्या विकासाच्या मॉडल व संघटनात्मक मजबुतीच्या माध्यमातून भाजपला या राज्यात सातत्याने यश मिळत आहे. गुजरातसह 7 राज्यांत भाजपचे प्रभारी राहिलेल्या ओम माथूर यांनी दिव्य मराठीशी बोलताना संघटनेला बळकटी प्राप्त करवून देण्यालाच भाजपचे पहिले प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.

2004 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजपने गुजरातमध्ये संघटनात्मक पातळीवर पन्ना प्रमुख बनवण्याची सुरुवात केली. प्रत्येक बूथवर व्होटर लिस्टच्या प्रत्येक पानाचा एक प्रमुख असतो. तो त्या पानात समाविष्ट असणाऱ्या मतदारांना सांभाळण्याचा त्यांच्या कायम संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. एवढेच नाही तर तो हे मतदार मतदान केंद्रापर्यंत जाऊन भाजपलाच मतदान करतील याची काळजीही घेतो. या पन्ना प्रमुखांच्याच बळावर भाजपला गुजरातमध्ये सातत्याने यश मिळत आहे.

माथूर म्हणाले - जनतेत नरेंद्र मोदींविषयी एक विश्वास आहे. 27 वर्षांत गुजरातमध्ये झालेल्या विकासामुळे लोकांमध्ये मोदी आपली सर्वच आश्वासने पूर्ण करतात असा विश्वास निर्माण झाला. हेच गुजरात मॉडल आहे. यामुळेच भाजप सातत्याने सत्तेत आहे. विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत भाजपने 182 पैकी सर्वाधिक 156 जागा जिंकल्या.

गुजरात मॉडलच्या खास गोष्टी

  • पक्षाच्या संघटनेत कार्यककर्त्यांची बूथ कमिटीपासून पन्ना प्रमुखांपर्यंतची जबाबदारी निश्चित आहे. यातील पहिली अट सर्वच कार्यकर्ते संगटनेत प्रत्यक्षपणे सक्रिय राहण्याची आहे.
  • भाजप नेत्यांत पदांसाठी रस्सीखेच केव्हाच दिसून आली नाही. त्यामुळे गुजरात भाजपमध्ये दुसऱ्या राज्यांसारखी गटबाजी केव्हाही प्रबळ झाल्याचे दिसून आले नाही.
  • गुजरातमध्ये सलग भाजपचे सरकार असल्यामुळे विकास वेगवान झाला. मोठे प्रकल्प प्रत्यक्ष आलरे. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रेल्वे-रोड-एअरपोर्टपासून मल्टीनॅशनल कंपन्यांच्या मोठे विभाग गुजरातच्या शहरांत आले. यामुळे लोकांचा भाजपच्या विकास मॉडेलवर विश्वास बसला.
  • नरेंद्र मोदींचे नेतृत्व व लोकांमधील विश्वसनीयता वाढली.
  • सुरक्षित वातावरणामुळे महिलांचे मतदानाचे प्रमाणही 70 टक्क्यांपर्यंत वाढले.
  • गुजरातमध्ये 2002 च्या गोधरा कांडानंतर केव्हाच दंगल उसळली नाही. या गोष्टीचाही भाजप सातत्याने फायदा घेते.

मोदी-शहांची विरोधकांचीही गळाभेट घेण्याची रणनीती

भाजपने निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर सारख्या विरोधकांनाही आपल्या पक्षात घेतले. यामुळे मतांत फूट पडली नाही. यंदाच्या निवडणुकीत 182 पैकी 103 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. गरत नि्वडणुकीत विजयी झालेल्या 99 पैकी 5 मंत्री व अनेक दिग्गजांसह 38 विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्यात आले. जुन्या चेहऱ्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवून बंडखोरी होणार नाही याची काळजीही घेण्यात आली.

राजस्थानात भाजपपुढे कोणती आव्हाने आहेत?

1. सक्रिय पन्ना प्रमुखांची रचना मोठे आव्हान

गुजरातमध्ये प्रत्येक मतदाराशी संपर्क ठेवणारे पन्ना प्रमुख सक्रिय आहेत. त्यांची नियुक्ती मतदार यादीतील प्रत्येक पाणाच्या हिशोबाने होते. पन्ना प्रमुखांचे काम भाजपची कामे प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवण्याचे असते. तसेच मतदानाच्या दिवशी त्यांना घरातून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्याचे व मतदान करवून घेण्यापर्यंत असते. एखादा मतदार बाहेर गेला असेल तर त्याच्या जागी दुसरा व्यक्ती मतदान करणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असते.

राजस्थानात संघटना मजबूत करण्यासाठी निवडणुकीत मतदारांना घरातून मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी गुजरातच्या धर्तीवर सक्रिय पन्ना प्रमुख तयार करण्याचे मोठे आव्हान भाजपपुढे आहे. भाजपचे प्रदेश मंत्री श्रवण सिंह बगडी यांच्या मते, राजस्थानात 52 हजार बूथ आहेत. त्यापैकी जवळपास 47 हजार बूथवरील बूथ कमिट्या स्थापन झाल्या आहेत. पन्ना प्रमुख बनवण्याचे् कामही सध्या सुरू आहे. पक्षासाठी पन्ना प्रमुखांची मोठी भूमिका असते.

2. नेतृत्वाची शर्यत संपुष्टात आणणे

ज्या प्रकारे काँग्रेसमध्ये नेतृत्वाच्या मुद्यावरून गटबाजी दिसून येते. तशीच गटबाजी राजस्थान भाजपमध्ये आहे. त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवून जनतेत विश्वासाचे वातावरण तयार करावे लागेल. निवडणुकीपूर्वी नेत्यांतील गटबाजी संपल्याचा विश्वास जनतेत निर्माण करावा लागेल. भाजपपुढे एकजूट होऊन काम करण्याची सर्वात मोठे आव्हान आहे.

3. काँग्रेसविरोधातील सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेणे

राजस्थानात संघटित गुन्हेगारी, भ्रष्टाचार, बेरोजगारी, शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी अनेक मोठे मुद्दे आहेत. सत्ताविरोधी लाटेचा फायदा घेण्याचेही भाजपपुढे आव्हान आहे. त्यानुसार, भाजपने सर्वच विधानसभा मतदार संघांत आक्रोश रॅली काढून जनतेत वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जयपूरमध्ये 1 डिसेंबर रोजी याची सुरुवात करण्यात आली. ही मोहीम 14 डिसेंबरपर्यंत चालेल. निवडणुकीला वर्षभराचा अवधी शिल्लक असताना एक कार्ययोजना तयार करून टीम तयार करावी लागेल.

हे छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 महिन्यांपूर्वीच्या राजस्थान दौऱ्याच आहे. तेव्हा भाजपचे सर्वच बडे नेते एका व्यासपीठावर दिसून आले होते.
हे छायाचित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2 महिन्यांपूर्वीच्या राजस्थान दौऱ्याच आहे. तेव्हा भाजपचे सर्वच बडे नेते एका व्यासपीठावर दिसून आले होते.

4. सर्वकाही विसरून एकत्र येण्याचे आव्हान

भाजपपुढे सर्वात मोठे आव्हान राज्यातील बड्या नेत्यांना एकत्रित आणून पक्षात एकवाक्यता दाखवण्याचे आहे. यासाठी काँग्रेसविरोधी सर्वच नेत्यांची एक मोट बांधावी लागेल. उदाहरणार्थ, गत लोकसभा निवडणुकीत आरएलपीशी आघाडी झाली होती. ती कायम राहिली असती तर सरदार शहरची पोटनिवडणूक भाजपचा 16 हजार मतांनी विजय झाला असता. या आघाडीअभावी भाजपला 25 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. कारण, आरएलपीच्या खात्यात 46753 मत गेले. त्यातील बहुतांश मतदान काँग्रेस विरोधी होते, ते भाजपला मिळाले असते. सत्ताधारी काँग्रेस विरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी कार्ययोजना तयार करण्याचे आव्हानही भाजपपुढे असेल.

5. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे आव्हान

गुजरातमधील लोकप्रियता घसरलेल्या नेत्यांची तिकीटे कापून भाजपने नव्या चेहऱ्यांना संधी दिली. गुजरात मॉडल लागू करण्याच्या स्थितीत भाजपला जिंकून येणारे नवे चेहरे शोधावे लागतील. गत निवडणुकीत मतदारांनी फेटाळलेल्या नेते व गटबाजीत लिप्त असणाऱ्या प्रभावशाली लोकांना बाजूला सारून नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवण्याचेही भाजपपुढे आव्हान आहे.

6. बंडखोरी रोखण्याचे आव्हान

गटबाजी व नव्या उमेदवारांना संधी देण्यामुळे पक्षात उफाळून येणारा असंतोष सांभाळणेही भाजपसाठी मोठे आव्हान ठरेल. संघटनेतील बड्या नेत्यांनी या कामासाठी स्वतःला वाहून घेतले तर हे आव्हान सहज शक्य होईल.

सर्वात मोठा प्रश्न - भाजप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करेल?

भाजपशासित राज्यात विद्यमान मुख्यमंत्रीच मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असतो. त्याच्याच नेतृत्वात निवडणूक लढली जाते. जिथे पक्ष सत्तेत नाही तिथे संघटनेच्या सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढली जाते. राजस्थानात भाजप सत्तेत नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केल्याने येथील गटबाजी उफाळून येण्याची भीती आहे. परिणामी, राजस्थानात भाजप सीएम पदाचा चेहरा घोषित करेल असे वाटत नाही. ज्येष्ठ नेते ओम माथूर यांनीही हे काम संसदीय मंडळाचे असल्याचे स्पष्ट केले आहे.

गुजरात मॉडल राजस्थानातही लागू होऊ शकते - सुनील भार्गव

गुजरात मॉडल व ते राजस्थानात लागू करण्यासाठी भाजपपुढे कोणती आव्हाने आहेत याविषयी दिव्य मराठीने भाजपच्या पॉलिसी व रिसर्च विंगचे प्रमुख सुनील भार्गव यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या मते, भाजपचे सरकार आल्यापासून गुजरात दंगलमुक्त झाले आहे. गुजरात विकासाचे व सर्वांना सोबत घेऊन चालणारे मॉडेल आहे.

गुजरातमध्ये नेतृत्वाची कोणतीही शर्यत नाही. पक्षात केवळ एक गट असून, तो एकजूट आहे. 40 टक्क्यांहून अधिक आमदारांचे तिकीट कापल्यानतंरही तिथे कोणताही मोठा असंतोष दिसून आला नाही, असे ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...