आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP In Strong Position With Rajya Sabha Results Before Presidential Elections; BJP Won 22 Out Of 57 Rajya Sabha Seats |marathi News

राष्ट्रपती निवडणुकीआधी रालोआ बळकट:भाजपने राज्यसभेच्या 22 जागा जिंकल्या, ममतांनी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने राज्यसभेच्या ५७ जागांपैकी अनपेक्षितरीत्या स्वत:च्या २२ जागा आणि एका अपक्षाचा विजय निश्चित केल्याने राष्ट्रपती निवडणुकीआधी रालोआची स्थिती आणखी बळकट केली आहे. राज्य विधानसभांतील संख्याबळानुसार भाजपला ५७ पैकी २० जागा मिळायला हव्या होत्या. मात्र, त्या पक्षाने २२ जागा जिंकल्या. राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्यांत त्यांचे २५ सदस्य आहेत. काँग्रेसने ९ जागा जिंकल्या असून त्यांचे ७ सदस्य निवृत्त होत आहेत.

आता राज्यसभेत भाजपच्या जागा ९५ वरून घटून ९२ तर काँग्रेसच्या २९ वरून ३१ होतील. राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्र, कर्नाटक आणि हरियाणात विखुरलेल्या विरोधकांचा थेट फायदा भाजपला मिळाला आहे. या तीन राज्यांशिवाय राजस्थानमध्येही भाजपने अपक्ष वा आपला उमेदवार उतरवले होते. राजस्थान वगळता तीन ठिकाणी त्याचा फायदा मिळाला. हरियाणात काँग्रेसला पुन्हा झटका बसला आहे. येथून पक्षाचे उमेदवार अजय माकन यांचा किरकोळ फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

ममतांनी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक बोलावली
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांची दिल्लीत बैठक बोलावली आहे. नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये १५ जून रोजी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्व प्रगतिशील विरोधी शक्तींनी रणनीती ठरवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...