आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Is Looking For Alternatives To Old Candidates; The List Of Possible Names Is Also Being Prepared

दिल्लीतून आलेल्या टीमकडून विधानसभेचा सर्व्हे:जुन्या उमेदवारांना पर्याय शोधतेय भाजप; संभाव्य नावांच्या यादीचीही तयारी सुरू

शिव दुबे | रायपूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विधानसभा निवडणुकीआधी साधारण ६ महिन्यांआधी भाजपने छत्तीसगडमध्ये आपल्या उमेदवारांचा शोध सुरू केला आहे. दिल्लीहून आलेले पथक प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे सर्वेक्षण करत असून कोणत्या नेत्याच्या बदल्यात कुणाला तिकीट दिले जावे याची चाचपणी केली जात आहे. अशा तीन ते चार नेत्यांची यादी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तयार केली जात आहे. यासाठी पक्षाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांची भेट घेतल्यानंतर लोकांशीही चर्चा केली जात आहे. या पूर्ण प्रक्रियेत राज्यातील नेत्यांना दूर ठेवले आहे. हे काम पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या देखरेखीखाली होत आहे. भाजप नेतृत्वाद्वारे केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणात प्रत्येक विधानसभेतील संभाव्य नावांवर भर दिला आहे. हे काम बस्तरपासून सरगुजापर्यंत सर्व ९० विधानसभा मतदारसंघांत सुरू आहे. सर्व्हेत १२ आमदारांच्या मतदारसंघांत पर्यायही निवडला जात आहे.

गुजरातआधी छत्तीसगडमध्ये फॉर्म्युला लागू २०१९ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणे सर्वेक्षण सुरू आहे. गुजरात निवडणुकीनंतर संपूर्ण देशातील निवडणुकीबाबत भाजपमध्ये गुजरात फॉर्म्युल्याची चर्चा होत आहे. मात्र, छत्तीसगडमध्ये असे प्रयत्न याआधी झाले आहेत. २०१९ च्या लोकसभेत भाजपने सर्व खासदारांची तिकिटे कापली . तेव्हा भाजपला ११ पैकी ९ जागा मिळाल्या होत्या. भाजपने राज्यात नवीन चेहऱ्यांना पुढे करण्याचे काम याआधीच सुरू केले आहे.

बातम्या आणखी आहेत...