आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हैदराबाद मनपा:केवळ 0.25% मते मागे राहिलेल्या भाजपचा आता महापौर पदावर डोळा, टीआरएसला 35.81% मतदान

हैदराबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तेलंगणातील नवे राजकारण

हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक संपली आहे. मात्र, संघर्ष संपलेला नाही. माध्यमातील वृत्तानुसार निवडणुकीत पूर्ण ताकद लावल्यानंतर भाजप आता तेवढीच ताकद महापौर पद मिळवण्यासाठी लावू इच्छितो.

हैदराबाद देशातील मोठ्या मनपापैकी एक आहे. ५.५ हजार कोटींपेक्षा जास्तीचा अर्थसंकल्प आहे. दुसरे म्हणजे आताच्या निवडणुकीत भाजपने मागील वेळेपेक्षा १२ पट जास्त जागा जिंकल्या. आधी भाजपच्या केवळ ४ जागा होत्या. यावेळी ४८ जागा मिळाल्या. तिसरे म्हणजे, भाजपला यातून तेलंगणात मार्ग जाताना दिसत आहे. यासाठी त्यांनी लोकसभेसारखा पूर्ण जोर लावत निवडणूक लढवली. त्यांची रणनीती खूप प्रमाणात यशस्वीही ठरली. टीआरएसनंतर दुसरा मोठा पक्ष ठरला आहे. यामुळेच आता भाजपचा डोळा हैदराबादच्या महापौर पदावर आहे. लवकरच निवडणूक होणार आहे. अधिसूचना निघाली नसली तरी राज्यातील सत्ताधारी टीआरएस, भाजप आणि ओवेसींचा एआयएमआयएमने तयारी सुरू केली आहे. सध्या टीआरएसचे बी. राममोहन महापौर आहेत. मात्र, ते पदावर कायम राहतील हे नक्की नाही. कारण टीआरएसला यावेळी १५० सदस्यांच्या मनपात ५५ जागाच मिळाल्या. यामुळे त्यांना महापौर पदासाठी तडजोड करावी लागेल किंवा एखाद्याची मदत घ्यावी लागेल. हीच बाब भाजपसाठीही लागू होत आहे.

गणित असे की, भाजप दोन्हीकडून राहील फायद्यात
मनपात एआयएमआयएमचे ४४ नगरसेवक आहेत. त्यांच्याशिवाय टीआरएस, भाजपचा महापौर होऊ शकत नाही. भाजपने निवडणुकीत टीआरएसवर एआयएमआयएमशी गुप्त कराराचा आरोप केला होता. टीआरएसने आरोप फेटाळून लावला होता. टीआरएसने महापौर निवडणुकीत एआयएमआयएमची मदत घेतल्यास भाजपला आरोप खरा असल्याचे म्हणता येईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser