आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिहारमध्ये BJP-JDU आघाडी संकटात:गुरूवारपर्यंत JDU-RJD चे सरकार स्थापन होण्याची शक्यता, नितीशकुमारांची सोनियांशी चर्चा

पाटणा2 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

बिहारमधील सत्ताधारी भाजप-जदयु आघाडी पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या सर्वच खासदार व आमदारांना पुढील 2 दिवसांत राजधानी पाटण्याला पोहोचण्याचे निर्देश दिलेत. त्यामुळे सत्ताधारी आघाडी मोडीत निघून राज्यात 11 ऑगस्टपर्यंत जदयु-राजद आघाडीचे सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दुसरीकडे, राजदनेही या दिशेने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. लालु प्रसाद यादवांच्या या पक्षानेही आपल्या सर्वच आमदारांना पाटण्यात राहण्याची सूचना केली आहे. विशेषतः राजद नेते तेजस्वी यादवही मंगळवारी आपल्या आमदारांशी चर्चा करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नितीश नयांनी सोनिया गांधींशी दूरध्वनीवरुन चर्चा केली आहे. त्यामुळे गुरूवारपर्यंत बिहारला नवे आघाडी सरकार मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण सरकारच्या भविष्याविषयी राजद नेत्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन केले नाही.

नितीश भाजपवर नाराज का?

 • सूत्रांच्या माहितीनुसार, नितीशकुमारांना सरकार चालवताना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिराग प्रकरणानंतर आरसीपी प्रकरणामुळेही ते भाजपवर नाराज आहेत.
 • गत काही महिन्यांत नितीश यांनी अनेक महत्वाच्या बैठकांपासून अंतर राखले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या मुद्यावर काही दिवसांपूर्वी बोलावलेल्या बैठकीलाही दांडी मारली आहे.
 • नितीशकुमारांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सन्मानार्थ देण्यात आलेल्या स्नेहभोजनाला व राष्ट्र्पती द्रौपदी मुर्मूंच्या शपथविधी सोहळ्यालाही दांडी मारली होती.
 • नितीश बिहारमधील भाजप नेत्यांनाही भेटी नाकारत आहेत. ते स्थानिक पातळीवरील कार्यक्रमांना हजर राहत आहेत. पण भाजप नेत्यांशी मुक्त संवाद साधण्यास ते टाळत आहेत.

आरसीपींना केंद्रात मंत्री केल्यामुळे नितीश नाराज

 • आरसीपी सिंह दिल्लीत गेल्यामुळे ललनसिंह व उपेंद्र कुशवाहा हे दोन नेते नितीशकुमारांच्या जवळ गेले. त्यामुळे आरसीपींना उत्तर प्रदेश निवडणुकीची देण्यात आलेली जबाबदारी यशस्वीपणे पेलता आली नाही.
 • त्याचा थेट फटका नितीशकुमारांना बसला. दुसरीकडे, जातीय जनगणना, लोकसंख्या नियंत्रणाच्या मुद्यावर आरसीपींनी जदयुच्याविरोधात भूमिका घेतली. यामुळेही आरपीसी नितीशकुमारांच्या नजरेत खुपू लागले होते.
 • नितीश 2020 मध्ये कमी जागा मिळाल्यानंतरही मुख्यमंत्री झाले होते
 • 2020 च्या विधानसभा निवडणुकीत नितीश यांच्या जदयुला अवघ्या 43 जागा मिळाल्या. याऊलट भाजपच्या जागा 74 वर पोहोचल्यात. त्यानंतरही भाजपने नितीश यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची दिली. या निवडणुकीत एनडीएला 125, तर महाआघाडीला 110 जागा मिळाल्या होत्या.

नितीश यांचा 22 वर्षांचा राजकीय प्रवास, 7 वेळा CM झाले

3 मार्च 2000 रोजी नितीशकुमार पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले होते
3 मार्च 2000 रोजी नितीशकुमार पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले होते
 • 3 मार्च 2000 रोजी नितीशकुमार पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले होते. पण बहुमताअभावी अवघ्या 7 दिवसांतच 10 मार्च रोजी त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यावेळी त्यांना भाजपचे समर्थन होते.
 • 2005 मध्ये नितीश यांनी भाजपच्या मदतीने निवडणूक लढली. त्यात त्यांना स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर 24 नोव्हेंबर 2005 रोजी दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेतली. ते आपला कार्यकाळ पूर्ण होईपर्यंत म्हणजे 24 नोव्हेंबर 2010 पर्यंत मुख्यमंत्रीपदी राहिले.
 • बिहारच्या जनतेने 2010 च्या निवडणुकीतही नितीश यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला. त्यांनी तिसऱ्यांदा 26 नोव्हेंबर 2010 रोजी बिहारची सूत्रे सांभाळली.
 • 2014 च्या लोकसभा निवडणुकीत चमकदार कामगिरी करता आली नाही. त्यामुळे 17 मे 2014 रोजी नितीश यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर जदयुचे जीतनराम मांझी मुख्यमंत्री झाले.
 • 2015 मध्ये जीतनराम मांझींना राजीनामा द्यावा लागला. 22 फेब्रुवारी 2015 रोजी नितीश कुमार चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. ते 19 नोव्हेंबर 2015 पर्यंत या पदावर राहिले.
 • 2015 च्या निवडणुकीत भाजपला फारकत दिल्यानंतर नितीश यांनी महाआघाडीत प्रवेश केला. त्यानंतर ते पुन्हा सत्तेत आले. 20 नोव्हेंबर 2015 रोजी त्यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण मध्येच त्यांनी राजदचा हात सोडून 26 जुलै रोजी 2017 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
 • राजदपासून विभक्त झाल्यानंतर नितीशकुमार पुन्हा एकदा भाजपसोबत गेले. त्यानंतर 27 जुलै 2017 रोजी सहाव्यांदा ते बिहारचे मुख्यमंत्री झाले.
 • 2020 च्या निवडणुकीत एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यानंतर नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
बातम्या आणखी आहेत...