आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Leader Assassinated In Uttar Pradesh; Student's Death Also Suspicious, Murder,

उत्तर प्रदेश:उत्तर प्रदेशमध्ये भाजप नेत्याची हत्या; विद्यार्थिनीचा मृत्यूही संशयास्पद, कायद्याची ऐशीतैशी राज्यात हत्या, अपहरण, छेडछाडीच्या घटना सुरूच

बागपतएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात मंगळवारी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष संजय खोखर (५२) यांची गोळी मारून हत्या करण्यात आली. खोखर सकाळी फेरफटका मारण्यासाठी शेतात गेलेले होते. परतताना घरापासून दीड किमी अंतरावर काही गुंडांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या प्रकरणात छपरौलीचे प्रभारी निरीक्षक दिनेश चिकारा यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक अजय कुमार सिंह म्हणाले, प्राथमिक तपासात ही पूर्ववैमनस्यातून घडलेली घटना असावी असे वाटते. हल्लेखाेरांनी खोखर यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. एक डाेक्यात व दुसरी छातीत गोळी लागली. आरोपींच्या अटकेसाठी पाच टीम सक्रिय आहेत, अशी माहिती पोलिस महासंचालक प्रवीण कुमार यांनी दिली. याप्रकरणी चोवीस तासांत कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. त्याचबरोबर जबाबदारी निश्चित करण्याचेही स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी देखील याची दखल घेतली. खोखर तीन वर्षे भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी त्यांना काढले होते.

बुलंदशहर : छेडछाडीतून प्राण गमवावा लागल्याचा नातेवाइकांचा आरोप
बुलंदशहर । उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात छेडछाडीपासून सुटका करून घेताना एक विद्यार्थिनी दुचाकी वाहनावरून पडून मृत्युमुखी पडल्याचे प्रकरण समोर आले आहे. सुदीक्षा भाटी असे विद्यार्थिनीचे नाव असून ती अमेरिकेत शिक्षण घेत होती. कोरोना संकटामुळे ती मायदेशी परतली होती. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सुदीक्षाचे वडील जितेंद्र भाटी म्हणाले, माझी मुलगी तिच्या काकांसमवेत नातेवाइकांकडे दुचाकीवरून जात होती. रस्त्यात काही दुचाकीस्वार गुंड तिची छेड काढत होते. हे गुंड त्यांना वारंवार आेव्हरटेक करत होते. अधूनमधून ते सुदीक्षाबद्दल अभद्र भाषेतही बोलत होते, नंतर त्यांनी सुदीक्षाच्या गाडीसमोर आपली बाइक आणून त्यांना रोखले. त्या गोंधळात सुदीक्षा गाडीवरून कोसळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तिचा मृत्यू झाला. सुदीक्षा एससीएलच्या ३.८३ कोटी रुपयांच्या शिष्यवृत्तीवर अमेरिकेत शिक्षण घेत होती.

{22 जून : कानपूरमध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ संजीत यादव (२८) यांची अपहरणानंतर हत्या. {3 जुलै : कानपूरमध्ये गँगस्टर विकास दुबे टोळीच्या हल्ल्यात ८ पोलिस शहीद. {22 जुलै : गाझियाबादमध्ये भाचीच्या छेडछाडीस विरोध, पत्रकार विक्रम जोशींची हत्या. {24 जुलै : गोंडामध्ये ४ कोटींच्या खंडणीसाठी ६ वर्षीय मुलाचे अपहरण. एसटीएफमुळे सुटका. {27 जुलै : गोरखपूरमध्ये १ कोटींच्या खंडणीसाठी पाचव्या वर्गातील बलरामची हत्या. {28 जुलै : कानपूरमध्ये २० लाखांच्या खंडणीसाठी ब्रजेश पाल यांचे अपहरण व हत्या. {10 अाॅगस्ट : बुलंदशहरात गाडीवरून पडून विद्यार्थिनी सुदीक्षाचा मृत्यू. छेडछाडीचा आरोप. {11 अॉगस्ट : बागपतमध्ये भाजप नेते खोखर यांची हत्या. यूपीतील ५१ दिवस : राजरोस अपहरण, हत्या

विरोधक : मुली कशा प्रगती करतील? : मायावती
मायावतींनी ट्विट करून प्रतिक्रिया दिली. गुणवंत सुदीक्षा भाटीला प्राण गमवावे लागले. ही गोष्टी अतीव दु:ख देणारी आहे. निंदनीय आहे. अखेर मुली प्रगती कशी करणार? सरकारने तत्काळ दोषींवर कडक कारवाई करावी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू म्हणाले, उत्तर प्रदेशात मुली सुरक्षित नाहीत. अशा घटना राज्यात दररोज घडू लागल्या आहेत. येथे जंगलराज सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...