आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Leader Babita Fogat's Cousin Strangles, Steps Up After Losing Wrestling Final

महिला कुस्तीपटूची आत्महत्या:बबिता फोगाटच्या मामेबहिणीने घेतला गळफास, कुस्तीच्या फायनल सामन्यात पराभूत झाल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

चरखी दादरीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाबीर फोगाट यांच्या गावातील घरी घेतला गळफास

दंगल गर्ल गीता फोगाट आणि भाजप नेत्या आणि कुस्तीपटू बबिता फोगाटची मामे बहिण रितिकाने सोमवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केली. रितिकाने आपली आत्या आणि माता महाबीर फोगाट यांच्या गावातील बलाली येथील घरी गळफास घेतला आहे. पोलिसांनी पोस्टमार्टमनंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवला आहे. मृतकावर अंत्यसंस्कार तिच्या वडिलांचे गाव राजस्थानच्या झुंझुनूं जिल्ह्याच्या जैतपूरमध्ये मंगळवारी करण्यात आले.

उपलब्ध माहितीनुसार, रितिकाने 12 ते 14 मार्चपर्यंत भरतपूरच्या लोहागड स्टेडियममध्ये राज्य स्तरीय सब-ज्यूनिअर, ज्यूनिअर महिला आणि पुरुष कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. या दरम्यान 14 मार्चला झालेल्या फायनल स्पर्धेत रितिकाचा पराभव झाला होता आणि सामन्या पराभव झाल्यामुळे रितिका धक्क्यात होती. 15 मार्चच्या रात्री जवळपास 11 वाजता महाबीर फौगाट यांचे गाव बलाली येथील घरातील एका खोलीत पंख्याला ओढणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

महावीर फौगाट यांच्या अकॅडमीत 5 वर्षांपासून ट्रेनिंग घेत होती
गीता आणि बबिताप्रमाणे आंतरराष्ट्रीय पैलवान बनण्यासाठी 17 वर्षीय रितिकाने आपल्या आत्याचा नवरा पैलवान महाबीर फौगाटच्या अकॅडमीमध्ये 5 वर्षांपासून प्रशिक्षण घेत होती. रितिका स्टेट चँपियनशिपमध्ये फायनल सामना केवळ एका अंकाने पराभूत झाली होती. या पराभवामुळे ती कोलमडली होती. यामुळेच तिने आपली जीवनयात्रा संपवली आहे. ती 53 किलोग्राम भारवर्गमध्ये खेळत होती. यापूर्वी ती जवळपास 4 वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झाली होती.

पैलवानने आत्महत्या करण्याचे प्रकरण समोर आले होते. ज्याचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोस्टमार्टम करण्यात आले आहे. या प्रकरणी त्यांचे वडील मैनपाल यांच्या जबाबावर आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. - दिलबाग सिंह, स्टेशन प्रभारी, झोझू कला

बातम्या आणखी आहेत...