आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोर्टाच्या निर्णयामुळे ठाकरे सरकारचे गाल सुजलेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रशासन आणि पोलिसांता गैरवापर करत आहे. मात्र, माफियांना आम्ही त्याची जागा दाखवून देऊ, राजद्रोह प्रकरणावरुन ठाकरे सरकारला चपराक बसली, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.किरीट सोमय्या यांनी आज राणा दाम्पत्याची भेट घेतली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
ठाकरे सरकार ही माफिया सरकार असून, महिला खासदारांना 20 फुट खोल खड्ड्यात टाकण्याची भाषा हे सरकार करत आहे. त्याप्रकरणी मी स्वत: लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार असून, माफिया सरकारविषयी त्यांना माहिती देणार आहे. असे सोमय्या म्हणाले. काल केंद्रीय गृहसचिव यांना देखील आपण भेटलो असून, त्यांना देखील राज्यातील माफिया सरकारविषयी माहिती दिली. उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारचे अंत करुनच आम्ही शांत बसणार, असा इशारा सोमय्या यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.
तुम्ही मुख्यमंत्र्यांचे गाल पाहिलेत का?
पुढे पत्रकारांनी सोमय्या यांना पीएमसीने दिलेल्या नोटीशाबाबत विचारले असता ते म्हणाले की, मुख्यमंत्री यांचे गाल दोनच आहे. कधी ते कनिष्ठ न्यायालयात जातात, कधी सेशन कोर्टात जातात, कधी हायकोर्ट, कधी सुप्रीम कोर्ट, तुम्ही त्याचे गाल पाहिलेत का? त्यांनी स्वत:च्या गालात मारुन घेतली, त्यांचे तोंड सुजले आहे, अशी खोचक टीका सोमय्यांनी केली आहे.
माफिया पोलिस कमिशनर कुठे आहेत
किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांचाही माफिया पोलिस कमिशनर म्हणून उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, माफिया पोलिस कमिशनर कुठे आहे, राजद्रोहाची कलम सुप्रीम कोर्टाने निरस्त केली असून, आता सुप्रीम कोर्टाकडून स्पष्टीकरण मागा, संजय पांडे सारख्या माफियागिरी करणाऱ्यांचा देखील आम्ही लवकरच अंत करू, असे आव्हान देखील सोमय्यांनी दिले आहे.
रावणाचा जन्म झाला, तर त्याची लंका जाळून टाकू
खासदार नवनीत राणा या शनिवारी हनुमान चालिसा पठण करणार आहे, यावर देखील सोमय्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, देशात दररोज कोट्यवधी जनता हनुमान चालिसाचे पठण करतात, आम्ही हनुमानाचे भक्त आहोत. जेव्हा-जेव्हा रावणाचा जन्म होता, तेव्हा-तेव्हा रामभक्त रावणाच्या लंकेला जाळून टाकतात, असे सोमय्या म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यात जर हिम्मत असेल तर...
अमरावतीत शिवसेनेच्या वतीने हनुमान चालिसाचे पठण करण्यात येणार असून, त्यावर बोलताना सोमय्या म्हणाले की, "उद्धव ठाकरे यांच्यात जर हिम्मत असेल तर, त्यांनी मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे पठण करुन दाखवावे, आमचे मुख्यमंत्री हे घाबरतात, असे सोमय्या म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.