आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनाली फोगाट पंचत्वात विलिन:चुलत भावासोबत मुलीने दिला मुखाग्नि; सन्मानार्थ पार्थिवावर ठेवण्यात आला BJP चा ध्वज

हिसार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोनालीची एकुलती एक मुलगी यशोधरा 15 वर्षांची आहे. 2016 मध्ये यशोधराच्या वडिलांचे निधन झाले. आता तिची आईही या जगात राहिली नाही.
  • :

हरियाणाच्या BJP नेत्या व टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी हिसारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांची कन्या यशोधरा हिने आपल्या चुलत भावाच्या मदतीने त्यांना मुखाग्नि दिला. यावेळी 'सोनाली अमर रहे' व 'सोनालीच्या खुन्यांना फाशी द्या' अशा घोषणा देण्यात आल्या. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केलेले कुलदिप बिश्नोईही यावेळी सोनालीला श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले होते.

सोनाली फोगाट अंत्यसंस्कार IN PHOTOS : मुलीने आईला दिला मुखाग्नी; मामाला म्हणाली- बाबा नाही, आईही गेली, मी एकटी कशी राहणार?

सकाळी 10.15 वाजता सोनालीचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी धुंदूर फार्म हाऊसवर आणण्यात आले. हे फार्म हाऊस हिस्सार-सिरसा राष्ट्रीय महामार्गावर हिस्सारपासून 10 किमी अंतरावर आहे. सोनालीची एकुलती एक मुलगी यशोधरा हिने येथून ऋषी नगर स्मशानभूमीपर्यंतच्या शेवटच्या प्रवासात त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला. त्यांच्या पार्थिवावर भाजपचा झेंडा लावण्यात आला होता.

कुलदीप यांचा मोठा खुलासा

सोनाली फोगाटचे मोठे दिर कुलदीप यांनी सुधीर सांगवान याच्याविषयी मोठा खुलासा केला आहे. सुधीर यांनी गुरुग्राममध्ये भाड्याने फ्लॅट घेण्यासाठी सोनाली फोगाट आपली पत्नी असल्याचे सांगितले होते, असे त्यांनी सांगितले आहे.

सरकारचा CBI चौकशीर आक्षेप नाही

हरियाणा चे CM मनोहर लाल यांनी म्हटले आहे की, सोनालीच्या कुटुंबीयांनी लिखित मागणी केली तर राज्य सरकार त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीची शिफारस करेल. सरकारची तपास करण्यावर कोणतीही हरकत नाही. उल्लेखनीय बाब म्हणजे सोनालीच्या कुटुंबीयांनी यापूर्वीच या घटनेची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. आपल्याला गोवा पोलिसांच्या तपासावर विश्वास नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सुधीर-सुखविंदर यांची आज पेशी

गोवा पोलिसांनी गुरूवारी सोनालीचा भाऊ रिंकू ढाकाच्या तक्रारीनुसार हत्येचा गुन्हा दाखल करुन सोनालीचा पीए सुधीर सांगवान व त्याचा सहकारी सुखविंदर याला अटक केली आहे. भादविं कलम 302 अंतर्गत हा गुन्हा सोनालीचे शवविच्छेदन झाल्यानंतर नोंदवण्यात आला. गोवा पोलिस सुधीर व सुखविंदर यांना आज न्यायालयात हजर करेल.

शरीरावर अनेक 'ब्लंट कट'

सोनालीच्या कुटुंबीयांच्या परवानगीनंतर गोव्यात गुरूवारी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. ते जवळपास 4 तास चालले. 3 डॉक्टरांच्या पॅनलने 11.45 वाजता शवविच्छेदन सुरू केले. ते सायंकाळी 4 च्या सुमारास संपले. त्याची व्हिडिओग्राफी करण्यात आली. यावेळी सोनालीचा भाऊ रिंकू ढाका व मेहुणा अमन पुनिया रुग्णालयात उपस्थित होते.

पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सोनालीच्या शरीरावर अेक 'ब्लंट कट' असल्याचा उल्लेख आहे. सोप्या भाषेत त्याला छुप्या जखमा म्हटले जाते. या जखमा काठीने किंवा लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने झाल्या काय हे सांगणे फार अवघड असते.

पहिल्यांदा रेस्टॉरंटमध्ये केले जेवण

गोवा पोलिसांच्या चौकशीत सोनालीने गोव्यात पोहोचल्यानंतर थांबलेल्या हॉटेलातच जेवण केले होते. 22 ऑगस्ट रोजी रात्री ती पहिल्यांदा रिसॉर्टबाहेर आली. त्यानंतर तिने कर्लीज रेस्टॉरंटमध्ये डिनर केला. त्यानंतर त्याच रात्री त्यांचा मृत्यू झाला. सोनालींचा मेहुणा अमन पुनिया यांनी सुधीरने तिला या कर्लीज रेस्टॉरंटमध्ये नेल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले -सुधीरने सोनालीला कर्लीजमध्ये नेले होते. तिथे सोनालीचा प्रकृती बिघडल्यानंतर सुधीर तिला घेऊन 3 तास लेडीज वॉशरुममध्ये बसला होता. त्याने सोनालीला रुग्णालयात का नेले नाही. याचा तपास झाला पाहिजे.

एकाच खोलीत थांबले होते सोनाली-सुधीर

गोवा पोलिसांनी सुधीर सांगवानला रिसॉर्टमध्येही नेले. सोनाली, सुधीर व सुखविंदर यांनी रिसॉर्टच्या 2 खोल्या बूक केल्या होत्या. त्यातील एका खोलीत सोनाली व सुधीर थांबले होते. तर दुसऱ्या खोलीत सुखविंदर थांबला होता. मंगळवारी सकाळी 7 वा. सुधीर आपल्या खोलीबाहेर आला. रिसॉर्ट व्यवस्थापनाच्या मते, सोनालीचा मृत्यू रिसॉर्टमध्ये झाला नाही. त्यांची रुग्णालयात नेताना प्राणज्योत मालवली.

बातम्या आणखी आहेत...