आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप नेते तेजिंदरपालसिंग बग्गा यांना अटक करून नेणाऱ्या पंजाब पोलिसांना शुक्रवारी हरियाणा पोलिसांनी कुरुक्षेत्रात रोखले. यानंतर दिल्ली पोलिस बग्गा यांना घेऊन दिल्लीत परतले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध वक्तव्य केल्यामुळे पंजाबच्या मोहालीत बग्गा यांच्यावर गुन्हा दाखल होता. पंजाब पोलिसांनी बग्गा यांना अटक केली. बग्गा यांच्या वडिलांनी मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली. यावर दिल्ली पोलिस सायंकाळी उशिरा पंजाब हायकोर्टात पोहोेचले. यावर शनिवारी सुनावणी होणार आहे.
दिल्ली पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा, हरियाणा पोलिसांनी पंजाब पोलिसांना कुरुक्षेत्रात रोखले ट्विटरवर ९.३ लाख फॉलोअर्स असणारे बग्गा प्रभावी व्यक्ती आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने दखल घेत पंजाब पोलिसांकडून त्यांना सोडवले.
पोलिसांनी दुसऱ्या राज्यातील प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक, या प्रकरणात पंजाब पोलिसांनी चूक केली
-या संपूर्ण प्रकरणात काय योग्य, काय अयोग्य?
एका राज्याचे पोलिस जेव्हा आरोपीला पकडण्यासाठी दुसऱ्या राज्यात जातात तेव्हा विशिष्ट प्रक्रिया लागते. सर्वप्रथम संबंधित पोलिस ठाण्यात जावे लागते. तेथे दैनिक रजिस्टरमध्ये नोंदीनंतर स्थानिक पोलिसांना घेऊन आरोपीला अटक केली जाते. आरोपीला त्याच पोलिस ठाण्यात न्यावे लागते. मग त्याला आपल्या राज्यात नेण्यासाठी स्थानिक न्यायालयाकडून प्राॅडक्शन वॉरंट घ्यावे लागते.
-पंजाब पोलिसांचे म्हणणे आहे की, स्थानिक पोलिसांना माहिती दिली असती तर आरोपी पळून गेले असते.
अशा परिस्थितीत काय होते?
यासाठीही एक प्रक्रिया आहे. अशी शंका असल्यास त्यांनी केस डायरीमध्ये तसे स्पष्ट नमूद करावे. मग हे पथक आरोपीला थेट अटक करू शकते. पण, अटक केल्यानंतर स्थानिक पोलिसांना माहिती देणे आवश्यक असते. कोर्टाकडून प्रॉडक्शन वॉरंट घेणे आवश्यक आहे.
-अशा प्रकरणांबाबत कोर्टाचे काही निकाल आहेत का?
होय, आले आहेत. २०१९ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला. यामध्ये, इतर राज्यांतील आरोपींच्या अटकेसाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली, जी निकालाच्या परिच्छेद क्रमांक १५ मध्ये आहेत. आरोपीला अटक करण्यापूर्वी आणि नंतर स्थानिक पोलिसांना माहिती देणे बंधनकारक आहे. हा निर्णय दिल्ली आणि एनसीआर क्षेत्रांसाठी आहे. हा निर्णय पंजाब पोलिसांनाही लागू होतो, पण तसे झाले नाही.
-तेजिंदर बग्गा प्रकरणाकडे कोणत्या दृष्टीने पाहता?
यात प्रथमदर्शनी पंजाब पोलिसांची चूक आहे. अटक करण्यासाठी ते दिल्लीत आली तेव्हा प्रक्रियेचे पालन करणे आवश्यक होते. बग्गा यांना घरातून अटक करण्यात आली तेव्हा ते कोणत्या पोलिस ठाण्यातून आले, त्यांचे कायदेशीर अधिकार काय आहेत? हे त्यांच्या कुटुंबीयांना सांगायला हवे होते. पंजाब पोलिसांनी
तसे काहीही केले नाही. बग्गाला अटक करून ते थेट पंजाबच्या दिशेने निघाले.
-दिल्ली पोलिसांनी हरियाणा पोलिसांच्या मदतीने बग्गाची पंजाब पोलिसांच्या ताब्यातून सुटका केली. एखाद्या खटल्यातील आरोपीला
पोलिसांच्या ताब्यातून सोडणे चुकीचे नाही का?
नक्कीच. पोलिसांच्या ताब्यातून आरोपीला सोडणे चुकीचेच आहे. पण, हे प्रकरण वेगळे आहे. पंजाब पोलिस दिल्ली पोलिसांना न कळवता बग्गाला घेऊन जात होते. बग्गा यांच्या वडिलांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यावर कारवाई करत दिल्ली पोलिसांनी हरियाणा पोलिसांकडून सहकार्य मागितले. बग्गा यांना घेऊन जाणाऱ्या पोलिस पथकाला हरियाणा पोलिसांनी अडवले. अशा परिस्थितीत हरियाणा पोलिसांची कारवाई चुकीची नाही. त्याचवेळी दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून ‘अपहरण प्रकरणातील पीडित’व्यक्तीची सुटका केली. कायद्याने त्याला चुकीचे म्हणता येणार नाही.
-पोलिसांसोबतच्या या संघर्षाबाबत आपले मत काय?
बग्गा यांना अटक करण्यापूर्वी पंजाबचे डीजीपी दिल्लीच्या पोलिस आयुक्तांशी संपर्क साधू असते. मग दिल्ली पोलिसांना त्यांना कायदेशीर मदत करावीच लागली असती. हे सर्व प्रकरण पाहून असे वाटते की हे गोलिस नाहीतच. जणू महाविद्यालयीन मुले एकमेकांशी भांडत आहेत.
-बग्गा केजरीवाल यांच्यावर हल्ला करत राहिले, आप सत्तेच्या पंजाबमध्ये त्यांच्यावर तणाव पसरवल्याचा गुन्हा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.