आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नेत्यांना कोरोना:मी हिमालयात होते, सोशल डिस्टन्सिंगचही पालन केले; पण तरीही मला कोरोनाची लागण झाली - उमा भारती

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उमा भारती यांना हिमालयातून आल्यानंतर हलका ताप जाणवत होता, तब्येत बिघडल्यामुळे केली कोरोनाची चाचणी

माजी केंद्रीय मंत्री आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी ट्विटरवर याची माहिती दिली. उमा भारती सद्या उत्तराखंडच्या यात्रेवर आहेत. त्यांनी लिहिले की, "मी तुमच्या माहितीसाठी हे ट्विट करत आहे. मी आज हिमालयाचा प्रवास संपण्याच्या शेवटच्या दिवशी प्रशासनाला कोरोना चाचणी घेण्याची विनंती केली. मला थोडासा ताप आला होता. मी हिमालयातील यात्रेदरम्यान कोविडपासून बचावासाठी सर्व नियमांचे पालन केले. परंतु तरीही माझाला रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मी सध्या हरिद्वार आणि ऋषिकेश दरम्यान वंदे मातरम् कुंजमध्ये क्वारंटाइन आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि स्वतःला आयसोलेट करावे."

देशातील एकूण रुग्णसंख्या 59 लाख 90 हजार 513

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 59 लाख 90 हजार 513 झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 49 लाख 38 हजार 641 लोक बरे झाले आहेत. तर 9 लाख 56 हजार 730 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 94 हजार 533 लोकांचा मृत्यू झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...