आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआखाती देशांनी भाजप नेत्या नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर आखाती देशांनी तीव्र हरकत नोंदवली आहे. कतार, कुवैत व इराणने या विधानाप्रकरणी भारतीय राजदुतांना नोटीस बजावली आहे. विशेषतः कतार व कुवैतने तर भारत सरकारकडे या प्रकरणी माफी मागण्याचीही मागणी केली आहे. तर सौदीने या प्रकरणी केवळ आक्षेप नोंदवला आहे. सौदी अरेबिया, कुवैत, बहारीन व अन्य अरब राष्ट्रांनी आपल्या सुपर स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या भारतीय उत्पादनांवर बंदीही घातली आहे.
याशिवाय मुस्लिम देशांच्या इस्लामिक सहकार्य संघटनेनेही (ओआयसी) या प्रकरणी हरकत नोंदवली आहे. संघटनेने सोशल मीडियावर म्हटले आहे की, "ओआयसीच्या सरचिटणीसांनी भारताच्या सत्ताधारी पक्षाच्या एका नेत्याने प्रेषितांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानावर तीव्र विरोध नोंदवला आहे."
निवेदनात पुढे म्हटले आहे -"भारतात गत काही दिवसांत मुस्लिमांविरोधातील हिंसाचारात मोठी वाढ झाली. अनेक राज्यांतील शैक्षणिक संस्थांत हिजाबवर बंदी घालण्यासह मुस्लिमांवर निर्बंधही लादले जात आहेत."
भारताने OIC चे विधान फेटाळले
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने ओआयसीच्या विधानावर हरकत नोंदवली आहे. मंत्रालयाने म्हटले आहे की, भारत ओआयसी सचिवालयाच्या अनावश्यक व क्षुल्लक टिप्पणीलाी स्पष्टपणे फेटाळून लावतो. भारत सरकार सर्वच धर्मांना आदर-सन्मान करते.
सौदी, बहारीनने केले निर्णयाचे स्वागत
भाजपने या प्रकरणी तत्काळ कारवाई करत प्रवक्ते नुपूर शर्मा यांची पक्षातून 6 वर्षांपासून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर भारताने एका निवेदनाद्वारे या प्रकरणी करण्यात आलेले वादग्रस्त विधान सरकारची अधिकृत भूमिका नसल्याचे स्पष्ट केले. सरकारने वादग्रस्त विधान करणाऱ्या नेत्यांची सत्ताधारी पक्षातून हकालपट्टी करण्याकडेही जगाचे लक्ष वेधले. सौदी अरेबिया व बहारीनने या फैसल्याचे स्वागत केले आहे.
भाजपनेही एका निवेदनाद्वारे पक्ष सर्वच धर्मांचा आदर करत असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनीही भाजप सर्वच धर्मांचा सन्मान करणारा पक्ष असल्याचे अधोरेखित केले आहे.
आखाती देशांत 76 लाख अनिवासी भारतीय
भारत व आखाती देशांत अत्यंत मजबूत संबंध आहेत. भारत आपल्याला लागणाऱ्या तेलाचा एक मोठा भाग या देशांकडून आयात करतो. याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाच्या डेटानुसार, जवळपास 76 लाख भारतीय मध्य पूर्वेतील देशांत नोकरी करतात.
कोरोना महामारीमुळे अडचणीत सापडलेली भारतीय अर्थव्यवस्था अद्याप रुळावर आली नाही. त्यामुळे हे प्रकरण अधिक चिघळले तर त्याचा गंभीर फटका देशाच्या आर्थिक प्रकृतीला बसू शकतो. भारत आपल्या एकूण गरजेच्या 52.7 टक्के तेल आखातातून इम्पोर्ट करतो.
विधान बिनशर्त मागे -नुपूर शर्मा
भाजपने पक्षातून निलंबित केल्यानंतर नुपूर शर्मा यांनी आपले विधान मागे घेतले आहे. त्या एका ट्विटमध्ये म्हणाल्या -"टीव्ही डिबेटमध्ये माझ्या ईश्वराविरोधात वारंवार वादग्रस्त विधाने केली जात होती. हे सर्व सहन करण्यापलिकडे गेले होते. त्यामुळे संतापाच्या भरात मी काहीतरी वादग्रस्त बोलले. हे विधान मी बिनशर्त मागे घेते." ------------------
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.