आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Leans On Central Leadership To Maintain Stronghold In South; Local Leadership Support To Congress

मिशन कर्नाटक:दक्षिणेतील किल्ला राखण्यासाठी भाजपची मदार केंद्रीय नेतृत्वावर; काँग्रेसला स्थानिक नेतृत्वाची मदत

नवी दिल्ली/बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण भारतातील भाजपकडे असलेले एकमेव कर्नाटक राज्य राखण्यासाठी पक्षाचे नेते जोर लावत आहेत. भाजप पूर्ण टीमसह दक्षिण भारतातील राज्ये तामिळनाडू, तेलंगण, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रातील नेत्यांवर विशेष जबाबदारी सोपवत आहेत. राज्यात काँग्रेसचे अभियान प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर अवलंबून आहे, त्याचप्रमाणे भाजपचीही संपूर्ण मदार केंद्रीय नेतृत्वासोबत माजी मुख्यमंत्री बीएस येदियुरप्पा यांच्यावर आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७, शहांनी ८, नड्डांनी १० वेळा दौरा केला.

माेदींनी किनारपट्टी भागातील कर्नाटक वगळता राज्याचा दौरा केला आहे. त्यांनी ४०,००० कोटींच्या प्रकल्पांची कोनिशला ठेवली किंवा उद्‌घाटन केले आहे. लोकनीती नेटवर्कचे राष्ट्रीय समन्वयक आणि राजकीय विश्लेषक प्रा. संदीप शास्त्री म्हणाले, राज्यात केंद्रीय नेतृत्वाने प्रचाराचे नेतृत्व स्वीकारले आहे. ते राज्य सरकारचे यश तसेच राज्यातील नेत्यांनाही पुढे आणत नाहीत. यात केवळ येदियुरप्पा यांच्याबाबतच बोलले जाते. मात्र,ते निवडणूक लढवत नाहीत. भाजप सरकार सत्ताविरोधी कलाचा सामना करत आहे. यामुळेच त्यांचे नेते केंद्राच्या कामांबाबत बोलत आहेत.

उमेदवार निवडीसाठी बैठक पुढील आठवड्यात भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी मिशन कर्नाटकसाठी येत्या आठवड्यात दिल्लीत राष्ट्रीय सरचिटणीसांची बैठक बोलावली आहे. ४० स्टार प्रचारकांत केंद्रीय मंत्री, राज्यांचे मंत्री आहेत. ५-६ एप्रिलला केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होऊ शकते. त्यात उमेदवार निश्चित होतील. सर्वांना राज्यात २ आठवड्यांचा वेळ देण्यास सांगितले आहे. मात्र,सूत्रांनुसार, ४०% आमदारांचे तिकीट कापले जाऊ शकते.

९ एप्रिलला मोदी-राहुल दोघांचा कर्नाटक दौरा पीएम माेदी ९ एप्रिल रोजी कर्नाटकमध्ये प्रोजेक्ट टायगरच्या सुवर्णमहोत्सवात सहभागी होतील. त्या दिवशी कोलारमध्ये राहुल गांधी सत्यमेव जयतेसह अनेक कार्यक्रमांत असतील.