आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव झालेल्या 160 जागा 2024 च्या निवडणुकीपर्यंत मजबूत करण्यासाठी भाजपने एक खास रणनीती आखली आहे. त्याअंतर्गत भाजप या सर्वच 160 लोकसभा मतदार संघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 45 हून अधिक रॅली आयोजित करण्याच्या मुद्यावर गांभीर्याने विचार सुरू केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप अध्यक्ष जे पी नड्डा या जागांवरून मिळालेल्या फीडबॅकच्या आधारावर पुढील व्यूहरचना आखत आहेत.
मोदींच्या प्रचारसभांची जबाबदारी
भाजपने आपले 3 राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, सुनील बंसल व तरुण चुघ यांच्या खांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या रॅलींची जबाबदारी सोपवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या लोकसभा मतदार संघांची वेगवेगळ्या क्लस्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे. वृत्तसंस्थेने एका भाजप सूत्राचा दाखला देत हा दावा केला आहे. या वृत्तानुसार, 2019 च्या निवडणुकीत भाजपचा पराभव झालेल्या 160 मतदार संघांचा वेगवेगळ्या क्लस्टरमध्ये समावेश करण्यात आले आहे. प्रत्येक क्लस्टरमध्ये 4 जागा आहेत. या क्लस्टरमध्ये पंतप्रधान मोदींच्या भव्य प्रचारसभांचे आयोजन केले जाईल. मोदी या सर्वच लोकसभा क्षेत्रांना कव्हर करत जवळपास 45 ते 55 प्रचारसभा घेतील.
160 जागांची 2 भागांत विभागणी
सूत्रांनी पुढे सांगितले की, केंद्र किंवा भाजप शासित राज्य सरकारांच्या परियोजनांची पायाभरणी किंवा उद्घाटनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचे आयोजन केले जाईल. याशिवाय रणनीती अंतर्गत या 160 जागांची वेगवेगळ्या 2 भागांत (प्रत्येकी 80 जागा) विभागणी करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी या 80 मतदार संघांत भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या प्रचारसभा होतील. तर उर्वरित 80 जागांवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभा होतील. त्यानंतर या मतदार संघांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होतील.
विनोद तावडेंचे पक्षात वाढले वजन
विनोद तावडे यांनी 2014 मध्ये सत्तेत आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजप सरकारमध्ये शिक्षणमंत्री होते. पण 2019 च्या निवडणुकीत अचानक त्यांचे तिकीट कापण्यात आले. यामुळे तावडे यांना मोठा धक्का बसला होता. पण त्यांनी आपल्या वेदना केव्हाच सार्वजनिक केल्या नाही. एखाद्या निष्ठावंत कार्यकर्त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या मतदार संघातील भाजप उमेदवाराचा प्रचार केला होता.
पण राजकारणात काहीच नित्य नसते, ही म्हण तावडेंना तंतोतंत लागू पडली. 2019 नंतर तावडेंची भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदी निवड झाली. त्यानंतर त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन भाजपने 2021 मध्ये त्यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदावर बढती दिली. त्यावेळी तावडेंनी आपल्याला आपल्या संयमाचे फळ मिळाल्याचे सांगितले होते. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.