आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP MLA Arrested After Offensive Remarks In Telangana; Also Suspended From The Party

टी. राजा यांना कारणे दाखवा नोटीस:तेलंगणामध्‍ये आक्षेपार्ह टिप्पणीनंतर भाजप आमदाराला अटक; पक्षातूनही निलंबित

हैदराबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेत्याने केलेल्या अवमानकारक वक्तव्यानंतर वाद उफाळला आहे. या वेळी तेलंगणचे एकमेव भाजप आमदार टी. राजा यांनी हे वक्तव्य केले आहे. याविरोधात तीव्र आंदोलनानंतर पोलिसांनी मंगळवारी राजा यांना अटक केली. दरम्यान, भाजपनेही राजा यांना पक्ष सदस्यत्व आणि पदांवरून निलंबित केले व कारणे दाखवा नोटीस बजावली.

दरम्यान, पोलिसांनी राजा यांना कोर्टात हजर केले तेव्हा त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. राजा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून व्हिडिओ हटवला आहे. वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत राहणाऱ्या राजा यांनी सोमवारी हास्य कलाकार मुनव्वर फारुखीवर एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात त्यांनी फारुखी आणि त्यांच्या आईवर विशिष्ट टिप्पणी केली होती. यासोबत त्यांनी एका विशिष्ट धर्माविरुद्ध आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

इकडे राज ठाकरे यांनी केले नुपूर शर्मा यांचे समर्थन मुंबई|महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या कथित टिप्पणीबद्दल त्यांचे समर्थन केले आहे. ठाकरे म्हणाले, झाकीर नाईकने असेच वक्तव्य केले होते, मात्र कुणी त्याला माफी मागण्यास सांगितले नाही. त्यांनी ओवेसी बंधूंचा निषेध करत त्यांच्याविरुद्ध कारवाई केली नसल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...