आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राजकीय संघर्ष:पश्चिम बंगालमधील भाजप आमदाराच्या मृत्यूने गदारोळ, 8 जिल्हे बंद

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तरीय अहवाल : रे यांचा मृत्यू फाशीने, शरीरावर खुणा नाहीत

पश्चिम बंगालमधील भाजप आमदाराच्या मृत्यू प्रकरणात भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. राज्यातील ममता बॅनर्जी यांचे सरकार बरखास्त करण्याची मागणी याप्रसंगी त्यांनी केली.कैलास विजयवर्गीय यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ भेटले. या भेटीबाबत विजयवर्गीय म्हणाले, हेमताबादचे आमदार देवेंद्र नाथ रे यांच्या मृत्यूची सीबीआयमार्फत चौकशी व्हायला हवी. प्रकरणाच्या चौकशीच्या दृष्टीने आम्हाला राज्यातील कोणत्याही तपास संस्थेवर विश्वास नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे. ममता बॅनर्जी सरकार बरखास्त केले जावे. कारण ममतांना आता सत्तेवर राहण्याचा अधिकार राहिलेला नाही. लोकप्रतिनिधी सुरक्षित नाहीत अशा ठिकाणी सामान्यांचे काय? याबाबत राज्यपालांकडून अहवाल मागवायला हवा. एवढेच नव्हे तर गेल्या तीन वर्षांत राज्यात भाजपशी संबंधित १०५ जणांची हत्या करण्यात आली आहे, असा आरोपही विजयवर्गीय यांनी केला.

उत्तरीय अहवाल : रे यांचा मृत्यू फाशीने, शरीरावर खुणा नाहीत

आमदार रे यांचा उत्तरीय अहवाल आला आहे. फाशीमुळे रे यांचा मृत्यू झाल्याचे त्यात नमूद केले आहे. त्यांच्या शरीरावर घाव किंवा इतर खूणा दिसल्या नाहीत. पश्चिम बंगालचे पोलिस म्हणाले, रे यांच्या शर्टच्या खिशातून मृत्यूपूर्व पत्र मिळाले आहे. त्यात दोन जणांना मृत्यूसाठी जबाबदार ठरवण्यात आले आहे. दुसरीकडे मात्र रे यांची हत्या झाल्याचा आरोप रे यांचे कुटुंबिय आणि भाजपने केला आहे.

८ जिल्ह्यांत संताप : भाजपचा १२ तासांचा बंद, १५ अटकेत

या घटनेच्या निषेधार्थ भाजपने उत्तर बंगालच्या आठ जिल्ह्यात १२ तासांच बंद ठेवला आहे. भाजपने मालदा जिल्ह्यात रॅली काढली. बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक -३४ बंद करण्याचाही प्रयत्न केला. काही ठिकाणी भाजप व तृणमूल कार्यकर्त्यांत संघर्ष झाल्याचेही वृत्त आहे. १५ जणांना अटक झाली.