आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक लोकायुक्तांनी भाजप आमदार मदल विरूपाक्षप्पा यांचे पुत्र प्रशांतकुमार यांना ४० लाखांची लाच घेताना अटक केली. शुक्रवारी त्याला १४ दिवसांची कोठडीत झाली. राज्य सरकार संचालित कर्नाटक सोप अँड डिटर्जंट लिमिटेडच्या (केएसडीएल) कार्यालयात ही कारवाई झाली.
बंगळुरू जल व मलनिस्सारण मंडळात प्रशांत मुख्य अकाउंटंट आहे. विरूपाक्षप्पा व प्रशांतच्या घर-कार्यालयात ८ कोटींची बेहिशेबी रोकड आढळली. केएसडीएलमध्ये म्हैसूर सँडल सोपचे उत्पादन केले जाते. कारवाईनंतर आमदारांनी केएसडीएलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.