आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुःखद बातमी:मध्यप्रदेशातील भाजप खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचे निधन, जानेवारीत झाले होते कोरोना संक्रमित

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजप खासदार यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दुःख व्यक्त केले आहे.

मध्य प्रदेशच्या खंडवाचे भाजप खासदार नंदकुमार सिंह चौहान यांचे मंगळवारी निधन झाले. कोरोना संक्रमित झाल्यानंतर 5 फेब्रुवारीला त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. डॉक्टरांनुसार, संक्रमण त्यांच्या फुफ्फुसांमध्ये पसरले होते. नंतर त्यांचाकोरोना रिपोर्ट निगेटिव्हही आला. मात्र त्यांच्या तब्येतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासह देश आणि प्रदेशातील अनेक नेत्यांनी चौहान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

नंदकुमार सिंह चौहान हे सहावेळा खासदार म्हणून लोकसभेमध्ये निवडून आले होते. तर दोन वेळा ते आमदारही राहिले आहेत. यासोबतच चौहान सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा राहिले आहेत. त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्षपदीही ते राहिले आहेत. नंदकुमार सिंह चौहान यांच्या निधनामुळे भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

भाजप खासदार यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले की, 'खंडवा येथील लोकसभा खासदार नंदकुमार सिंह चौहान यांच्या निधनाने दुःखी आहे. त्यांना मध्य प्रदेशात भाजपला मजबूत करण्याच्या संघटन कौशल्य आणि आणि त्यांच्या प्रयत्नांसाठी स्मरणात ठेवले जाईल. त्यांच्या कुटुंबाप्रती संवेदना'

बातम्या आणखी आहेत...