आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप खासदाराचा मृत्यू:खासदार रामस्वरूप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू, फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह; मृत्यूचे कारण अस्पष्ट

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रामस्वरुप शर्मा हे दिल्लीतील गोमती अपार्टमेंटमध्ये सध्या वास्तव्यास होते.

राजधानी दिल्लीमध्ये भाजपचे मंडी, हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. गोमती या खासदार निवासस्थानी पहाटे त्यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फासावर लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळला. अद्याप मृत्यूचे कारण समोर आलेले नाही.

रामस्वरुप शर्मा हे सध्या दिल्लीतील गोमती अपार्टमेंटमध्ये सध्या राहत होते. लोकसभा निवडणूक 2019 मध्ये त्यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवला होता. एका महत्त्वाच्या मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. काँग्रेस उमेदवार आश्रय शर्मा यांना त्यांनी जवळपास 4 लाख मतांनी हरवले होते.

दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 8.30 वाजेदरम्यान या घटनेची पहिल्यांदा सूचना मिळाली. अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शर्मा यांचा मृतदेह फाशीला लोंबकळलेल्या अवस्थेत आढळला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...