आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजप खासदाराच्या सुनेने त्यांच्या घरासमोरच येऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न आपल्या हाताची नस कापली. मोहनलाल गंज येथून खासदार असलेले कौशल किशोर यांच्या लखनऊतील घरासमोर रात्री उशीरा ही घटना घडली. त्यांची सून अंकिता सिंह हिने हाताची नस कापल्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. पतीने लव्ह मॅरेजनंतर सोडून दिला असा आरोप तिने केला. सोबतच, त्याचे वडील खासदार आणि आई आमदार असल्याने आपले कुणी ऐकून घेत नाही असेही तिने म्हटले आहे. खासदार कौशल किशोर यांनी सांगितल्याप्रमाणे, आयुषने लव्ह मॅरेजनंतर कुटुंबियांना सोडून भिटौली येथे राहण्याचा निर्णय घेतला होता.
आत्महत्येच्या प्रयत्नाचा व्हिडिओ व्हायरल
आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी अंकिताने 5 मिनिटांचा एक व्हिडिओ जारी केला. त्यामध्ये खासदाराची सून रडता-रडता सांगताना दिसून येते की "मी जग सोडून जात आहे. आयुष (पती) यात माझी काहीच चूक नाही. तू मला जगण्यासाठी एकही कारण सोडलेला नाहीस. तू मला सोडून गेलास. एकदाही विचार केला नाही की माझे काय होईल. तुझी आई आमदार आणि बाप खासदार असल्याने माझे कोण ऐकणार?" अंकिताने रविवारी रात्री उशीरा सोशल मीडियावर हा व्हिडिओ पोस्ट करून आपल्या स्कूटीने खासदार सासऱ्याचे घर गाठले. सुरुवातीला त्या ठिकाणी जाऊन आपल्या पती आयुषला आवाज दिला. पोलिसांनी तिला अडवण्याचे प्रयत्न केले. तेव्हा तिने आपल्या हाताची नस कापली.
पोलिसांसमोर हजर झाला पती आयुष
गेल्या काही दिवसांपासून फरार असलेला पती आयुष रविवारी रात्री पोलिसांसमोर हजर झाला. त्याने सुद्धा एक व्हिडिओ व्हायरल करून आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. त्यावर अंकिताने त्याची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली होती.
असे आहे प्रकरण
याच महिन्यात 2 तारखेला आयुषयवर रात्री 2 च्या सुमारास गोळीबार झाला होता. त्यानंतर या फायरिंग प्रकरणी पोलिसांनी आयुषची पत्नी अंकिताचा भाऊ आदर्श याला कटकारस्थान प्रकरणात अटक केली. पोलिस आयुक्त डीके ठाकूर यांनी दावा केला होता, की आयुषने काही लोकांना अडकवण्यासाठी मुद्दाम गोळीबाराचे नाट्य केले होते. आदर्शला पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तसेच आयुषचा शोध सुरू झाला. तेव्हापासून फरार असलेला आयुष आता रविवारी हजरतगंज पोलिसांसमोर हजर झाला.
उल्लेखनीय बाब म्हणजे, तीन दिवसांपूर्वीच हायकोर्टाने आयुषच्या अटकेला स्थगिती दिली आहे. आयुषच्या विरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम 120 ब, 420, 505 अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे. हे सर्व आरोप सिद्ध झाले तरीही त्याला 7 वर्षांपेक्षा अधिकचा तुरुंगवास होणार नाही. त्यामुळेच कोर्टाने त्याला अटकेपासून दिलासा दिला असा तर्क आहे. आरोपी फरार होण्याची शक्यता असेल तर न्यायाधीशांना तसे सांगून अटक केली जाऊ शकते.
7 महिन्यांपूर्वीच झाली भेट मग विवाह
आयुषने एका आठवड्यापूर्वी एक व्हिडिओ जारी करून आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले होते. त्याने सांगितल्याप्रमाणे, 7 महिन्यांपूर्वीच त्याची आणि अंकिताची भेट झाली होती. तिच्याकडूनच लग्नाचा दबाव होता. मी तिच्या प्रेमात वेडा झालो होतो. त्यामुळेच कुटुंबियांच्या विरोधात जाऊन मी विवाह केला होता. तिने रेल्वे रुळावर बसवून मला कुटुंबियांना व्हिडिओ कॉल करायला लावला होता. त्यामध्ये मी आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. तेव्हा माझ्या वडिलांना मोठा मानसिक धक्का बसला होता.
आयुषने केलेल्या आरोपानुसार, अंकिता आज मीडियासमोर स्वतःला खासदाराची सून म्हणून मिरवत आहे. मीडियाने तिचे मूळ गाव असलेल्या बहराइचच्या हुजूरपुर येथे जाऊन माहिती काढावी. तेव्हा तिचे कारस्थान सर्वांसमोर येईल. तिने अनेक विवाह केले आहेत. प्रदीप कुमार सिंह नावाच्या एका व्यक्तीला तर तिने अजून घटस्फोट सुद्धा दिलेला नाही. जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता मी तिला आणि तिच्या घरच्यांना सांभाळलो. माझ्याकडचा पैसा संपला तेव्हा तिने आपला खरा रंग दाखवला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.