आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत रूपा गांगुली रडल्या:बिरभूम हिंसाचारावर बोलताना भाजप खासदाराला अश्रू अनावर, म्हणाल्या -तिथे खून होत आहेत, बंगाल आता राहण्यायोग्य राहिले नाही

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप खासदार रूपा गांगुली यांना शुक्रवारी राज्यसभेत पश्चिम बंगालमधील बिरभूम हिंसाचारावर बोलताना अश्रू अनावर झाले. त्या म्हणाल्या, आम्ही पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तिथे सामूहिक हत्याकांड होत आहेत. लोक पलायन करत आहेत. बंगाल आता राहण्यासाठी योग्य राहिला नाही.

तत्पूर्वी, बिरभूम हत्याकांडातील महिला व मुलांवर झालेल्या अमानवीय व्यवहारावर रूपा गांगुली यांनी शून्य प्रहरात नोटीस दिली होती.

राज्यस्थेची कारवाई स्थगित

रूपा गांगुली यांनी बिरभूम हत्याकांडाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळ स्थगित करण्यात आले. त्यानंतर सभागृहाबाहेर पडल्यानंतर गांगुलींनी पश्चिम बंगालच्या लोकांना आता बोलताही येत नसल्याचा आरोप केला. बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेसचे सरकार आरोपींना पाठिशी घालत आहे. निवडणूक जिंकल्यानंतर जनतेचे प्राण घेणारे देशात असे दुसरे कोणतेही सरकार नाही. आम्ही माणूस आहोत. आम्ही पाषाण ह्रदयाने राजकारण करत नाही, असे त्या म्हणाल्या.

रामपूरहाटच्या बागतुई गावात सीएफएसएलचे पथक

सीबीआयच्या केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांचे एक पथक शुक्रवारी बागतुई गावात पोहोचली. या पथकाने गावातील जळालेल्या घरांची पाहणी करुन काही नमुणे गोळा केले. या पथकात ८ जणांचा समावेश असून, त्यांच्यासोबत स्थानिक पोलिसांचा फौजफाटाही आहे. या प्रकरणी पथकातील काही अधिकाऱ्यांना छेडले असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. पथक येथे पुरावे गोळा करण्यासाठी आले आहे. याहून जास्त बोलण्यास आम्हाला अधिकार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...