आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
दिल्लीतील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीला संबोधित केले. या बैठकीत पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, पुद्दूचेरी आणि आसाम यांच्या निवडणुकांच्या रणनितीवर चर्चा झाली. या राज्यात यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्व राज्यात भाजप जोरदार आक्रमक दिसत आहे.
पंतप्रधान मोदींशिवाय पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, गृहराज्यमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी या बैठकीला उपस्थित असतील. प्रदेशाध्यक्षांसह प्रभारी व सह प्रभारीही बैठकीस उपस्थित होते.
राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीपूर्वी शनिवारी पक्षाच्या संघटनेच्या सरचिटणीसांची भेट भाजप मुख्यालयात झाली. यामध्ये जेपी नड्डा यांनी निवडणूक राज्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट घेतला.
शेतकरी आंदोलनावरही झाली चर्चा
गेल्या अनेक महिन्यांपासून दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. अशा परिस्थितीत पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत शेतकरी आंदोलनावरही चर्चा झाली. यात भाजप सरकारमध्ये शेतकऱ्यांना या तिन्ही कायद्यांविषयी जागरूक कसे करावे यासाठी रणनिती आखली आखली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.