आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP National President J.P. Nadda's Twitter Account Hacked; Mention Of Russia Ukraine By Hackers | Marathi News

नड्डांचे ट्विट हॅक:भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचे ट्विटर अकाउंट हॅक; हॅकर्सकडून रशिया-युक्रेनचा उल्लेख

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रशिया-युक्रेन युद्धाचा आज चौथा दिवस आहे. भारताने या प्रकरणात काहीही न बोलण्याची भूमिका दर्शवली असताना, दोन्ही देशाचा उल्लेख करत हॅकर्सने भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचे ट्विटर अकाउंट हॅक केले आहे. विशेष म्हणजे काही वेळातच 'सॉरी माझे अकाउंट हॅक झाले' असे ट्विट देखील हॅकर्सने केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

हॅकर्सने जे.पी. नड्डा यांचे ट्विट खाते हॅक करुन, त्यावरुन रशिया आणि युक्रेन या देशांच्या मदतीसाठी आपण क्रिप्टोकरन्सीच्या रुपात मदत करणार असल्याचे म्हटले आहे. रशियाच्या पाठिशी उभे राहा, आता क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमात मदत स्वीकारली जाईल. तसेच बिटकॉइन आणि इथेरियम मदत देखील स्वीकारली जाईल. असा संदेश हॅकर्सने नड्डा यांच्या ट्विट खात्यावरुन केले आहे.

रशियाच्या क्रिप्टोकरन्सीच्या ट्विटनंतर हॅकर्सने पुन्हा एक ट्विट केल्याने खळबळ उडली आहे. हॅकर्सने आपल्या दुसऱ्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, युक्रेनसोबत उभे राहा. क्रिप्टोकरन्सी दान करा. त्या पाठोपाठ 'माझे अकाउंट हॅक झाले नाही. सर्व दान युक्रेनच्या सरकारला दिले जाणार आहे', असा संदेश या अकाउंटवर हॅकरकडून पोस्ट करण्यात आला. नड्डा यांचे ट्विट अकाउंट हॅक केल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र आता त्यांचे ट्विट अकाउंट पू्र्वरत करण्यात आले आहे.

नड्डा यांच्या ट्विट हॅक प्रकरणी कंप्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम चौकशी करत आहे. ट्विटरकडूनही याबाबत अधिक माहिती मागवण्यात आली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील ट्विट खाते हॅक करण्यात आले होते. 'भारतात अधिकृतरित्या बिटकॉइनला मान्यता देण्यात आली आहे' असे ट्विट हॅकर्सकडून करण्यात आले होते. मात्र काही वेळातच मोदींचे देखील ट्विट खाते पू्र्वरत करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...