आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Bjp Nationwide Protests Over Bilawal Bhutto Statement Against Narendra Modi |india Pakistan

मोदी 'कसाई' - पाक परराष्ट्र मंत्र्यांची टीका:भाजपची पाकविरोधात देशभर निदर्शने; तेजस्वी सूर्या म्हणाले - बिलावल पाकचा पप्पू

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी भाजप शनिवारी देशभर निदर्शने करत आहे. शुक्रवारीही भाजपने पाक उच्चायोगापुढे निदर्शने केली होती. त्यात भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी बिलावल पाकचे पप्पू असल्याची उपरोधिक टीका केली होती. बिलावल भुट्टो गुरुवारी म्हणाले होते - ओसामा बिन लादेन मारला गेला. पण गुजरातचा कसाई अजून जिवंत आहे. तो सध्या भारताचा पंतप्रधान झाला आहे.

1971 चा विसर पडला असावा -भारत

पाक परराष्ट्र मंत्र्यांच्या या विधानावर भारताने तीव्र हरकत नोंदवली आहे. भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, बिलावल फेल झालेल्या देशाचे प्रतिनिधी असून, स्वतःही फेल झालेत. अतिरेकी मानसिकता असणाऱ्या लोकांकडून तुम्ही चांगली अपेक्षा करू शकत नाही. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते् अरिंदम बागची यांनी पाकला 1971 चा विसर पडल्याची बोचरी टीका केली आहे.

बिलावल भुट्टोंच्या पीएम मोदींविरोधातील विधानाप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी निदर्शने केली होती.
बिलावल भुट्टोंच्या पीएम मोदींविरोधातील विधानाप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी निदर्शने केली होती.

पाक परराष्ट्र मंत्र्यांच्या विधानामुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पाक उच्चायोगापुढे निदर्शने केली. त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बॅरिकेड्स लावले. पण संतप्त जमाव ते ओलांडून पुढे सरकला. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी अनेक भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

बिलावल पाकचा पप्पू -सूर्या

निदर्शनांत सहभागी भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या म्हणाले - बिलावला पाकचा पप्पू म्हटले जाते. जगातील बहुतांश देशांना पाकशी कोणत्याही प्रकारचे संबंध नको आहेत. आज मोदींच्या नेतृत्वात अवघे जग दहशतवादाविरोधात एकजूट होत आहे. बिलावलच्या आईची हत्याही अतिरेक्यांनी केली होती. त्यानंतरही ते अतिरेक्यांची पाठराखण करत आहेत.

एस जयशंकर यांनी UNSC ब्रीफिंगमध्ये चीन व पाकवर निशाणा साधला होता.
एस जयशंकर यांनी UNSC ब्रीफिंगमध्ये चीन व पाकवर निशाणा साधला होता.

‘मेक इन पाकिस्तान टेररिज्म’वर बंदी घाला

गुरुवारी भारतीय परराष्ट्र मत्री एस जयशंकर यांनी UNSC मधील ब्रीफिंगमध्ये पाक दहशतवादाचा केंद्रबिंदू असल्याचा आरोप केला. त्यानंतर बिलावल यांनी पीएम मोदींविषयी वादग्रस्त विधान केले. भारताने त्यावर पलटवार करत पाक भारताकडे बोट दाखवण्याएवढा शहाणा नसल्याची टीका केली. आता ‘मेक इन पाकिस्तान टेररिज्म’वर बंदी घालावी लागेल.

परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे म्हटले आहे की, न्यूयॉर्क, मुंबई, पुलवामा, पठाणकोट व लंडन शहरांत पाक पुरस्कृत दहशतवादाच्या जखमा ओल्या आहेत. पाकच्या विशेष टेररिस्ट झोनमध्ये जन्मलेला दहशतवाद जगभर पसरला आहे. पाकिस्तानात ओसामा बिन लादेनला शहीद म्हणून सन्मान दिला जातो. हाफीज सई, लखवी, मसूद अजहर, साजीद मीर व दाऊद इब्राहिम सारख्या अतिरेक्यांना आश्रय दिला जातो. संयुक्त राष्ट्राने अतिरेकी घोषित केलेले 126 अतिरेकी व 27 संघटना पाकमध्ये अस्तित्वात आहेत.

भारताने बिलावल यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करून त्यांच्यावर टीका केली.
भारताने बिलावल यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करून त्यांच्यावर टीका केली.

बिलावल यांना 1971 चा विसर -परराष्ट्र मंत्रालय

परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे बिलावल भुट्टो यांना 16 डिसेंबर 1971 च्या दिवसाचा विसर पडल्याचा आरोप केला. या दिवशी पाकच्या 90 हजारांहून अधिक सैनिकांनी भारतीय लष्करापुढे आत्मसमर्पण केले होते. पाकिस्तानी शासकांनी बंगाली व हिंदू बांधवाच्या केलेल्या नरसंहारानंतर हे घडले होते. पाकचा अल्पसंख्यकांविषयीचा व्यवहार अजून बदलला नाही. पाक आता अतिरेक्यांचा वापर करत नाही. बिलावल भुट्टो यांचे असभ्य विधान त्याच्या या नव्या भूमिकेचे द्योतक आहे.

बिलावल भुट्टोंनी आपल्या देशातील दहशतवाद्यांद्यावर निवेदन द्यावे. त्यांनी दहशतवादाला आपल्या सरकारी धोरणात स्थान दिले आहे. पाकला आपला दृष्टिकोन बदलावा लागेल.

माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही पाकचा कुटिल डाव आता जगापुढे आल्याची टीका केली.
माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनीही पाकचा कुटिल डाव आता जगापुढे आल्याची टीका केली.

पाकने दहशतवादाला प्रोत्साहन दिले - अनुराग ठाकूर

परराष्ट्र राज्यमंत्री म्हणाले की, बिलावल यांच्या विधानामुळे ते एका मानसिक व आर्थिकदृष्ट्या दिवाळखोर देशाचे नेतृत्व करत असल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे, अनुराग ठाकूर यांनी पाकच्या भूभागाचा वापर नेहमीच दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी होत असल्याचा आरोप केला आहे.

बातम्या आणखी आहेत...