आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिल्ली महापालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीने (आप) १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपला पराभूत करून पहिल्यांदाच बहुमत मिळवले आहे. बुधवारी मतमोजणी झाली. महापालिकेच्या २५० जागांपैकी आपला १३४, भाजपला १०४, काँग्रेसला ९ जागा मिळाल्या. तीन जागा अपक्षांना मिळाल्या. बहुमतासाठी आवश्यक १२६ पेक्षा आपला ८ जागा अधिक मिळाल्या. २०१७ मध्ये २७० सदस्यांच्या महापालिकेत भाजपकडे १८१ आणि आपकडे ४८ जागा होत्या.
15 वर्षांचा योगायोग {विधानसभेत १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेसला २०१३ मध्ये पराभूत करून आपने सत्ता मिळवली होती.
पोटनिवडणूक निकाल {राजस्थानसह ५ राज्यांतील ६ विधानसभा व मैनपुरी लोकसभा पोटनिवडणुकीचा निकालही गुरुवारी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.