आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • At Modi's Behest, Sudha Defeated Indrajit From The Royal Family And Vanathi Defeated Kamal Haasan.

दिग्गजांना हरविणाऱ्या ​​भाजपच्या रणरागिणी:सुधा यादव यांनी राजघराण्यातील इंद्रजित तर वनाथी यांनी कमल हसन यांचा पराभव केला

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने संसदीय मंडळ आणि निवडणूक समिती जाहीर केली आहे. यामध्ये नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, कैलास विजवर्गीय या दिग्गजांना वगळण्यात आले. मात्र, दोन महिला नेत्यांना या समितीत स्थान देण्यात आले आहे. यात सुधा यादव आणि वनाथी श्रीनिवासन या दोन महिला नेत्यांचा समावेश करण्यात आला. सुधा यांना दोन्ही समित्यामध्ये स्थान देण्यात आले. तर वनाथी यांना प्रचार समितीत स्थान देण्यात आले.

सुधा यांनी मोदींच्या सांगण्यावरून निवडणूक लढवली

सुधा यादव यांच्या राजकारणातील प्रवेशाची कहाणी 1999 च्या कारगिल युद्धापासून सुरू होते. या युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना रोखताना सुधा यांचे पती आणि बीएसएफमधील डेप्युटी कमांडंट सुखबीर सिंह यादव हे शहीद झाले. सुधा यादव यांच्या आयुष्यात आलेले दु:ख संपून काही दिवस उलटले नव्हते, की देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या. अशा परिस्थितीत त्यांना भाजपच्या एका नेत्याचा फोन आला की त्यांनी महेंद्रगडमधील काँग्रेस उमेदवार आणि राजघराण्यातील राव इंद्रजित सिंग यांच्या विरोधात निवडणूक लढवावी.

सुधा यादव यांनी आयआयटी रुरकीमधून शिक्षण घेतले. हुतात्मा विधवेचा कोट्यातून त्यांना प्राध्यापकाची नोकरी मिळालेली होती. त्यामुळे सुधा यांनी त्या भाजप नेत्याला नम्रपणे नकार दिला. पण जेव्हा त्या नेत्याने तिला सांगितले की, आज कुटुंबापेक्षा देशाला तुमची गरज आहे. तेव्हा सुधा यांनी निवडणूक लढवण्यास होकार दिला. ज्या नेत्याने सुधा यादव यांना निवडणूक लढवायला लावले. ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी होते, जे त्यावेळी हरियाणाचे निवडणूक प्रभारी होते.

आधी मोदींनी 11 रुपये दिले, नंतर लाखो रुपये जमा झाले

निवडणूक लढविण्याच्या वेळेस राव इंद्रजित सिंग हे कॉंग्रेसचे दिग्गज नेते होते. राजघराण्यातील असल्याने 'राज' आणि 'नीती' त्यांना वारसाहक्काने मिळाले होते. शहीद जवानाच्या विधवेकडे रेवाडी राजघराण्यातील राव इंद्रजीत सिंग यांच्याविरुद्ध लढण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. ही समस्याही नरेंद्र मोदींनी सोडविली. स्थानिक कार्यकर्त्यांची बैठक बोलावली. या भेटीत त्यांनी आई हिराबेन यांच्याकडून मिळालेले 11 रुपये सुधा यादव यांना निवडणूक लढवण्यासाठी दिले. आणि उपस्थित सर्वांना मदतीचे आवाहन केले. त्यानंतर काही मिनिटांतच सुधा यांच्या निवडणुकीसाठी साडे सात लाख रुपये जमा झाले.

दणदणीत विजय मिळाला, मात्र, पुढील दोन निवडणुका हरल्या

सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल आले तेव्हा सुधा यादव यांनी त्यांच्या आयुष्यातील पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते राव इंद्रजित सिंग यांचा सुमारे दीड लाख मतांनी पराभव केला होता. आज त्याच सुधा यादव भाजपच्या सर्वात शक्तिशाली संसदीय मंडळाच्या एकमेव महिला सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्या अगोदर माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या एकमेव महिला समितीच्या सदस्य होत्या. यानंतर सुधा यादव यांना 2004 मध्ये महेंद्रगड आणि 2009 मध्ये गुडगावमधून लोकसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर पक्षाने त्यांना संघटनेत स्थान दिले. 2015 मध्ये त्यांना भाजप ओबीसी मोर्चाचे प्रभारी बनविण्यात आले.

52 वर्षीय वनाथी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी परिषदेतून केली. वनाथी आणि त्यांचे पती दीर्घकाळापासून संघ परिवाराशी जोडलेले आहेत.
52 वर्षीय वनाथी यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात विद्यार्थी परिषदेतून केली. वनाथी आणि त्यांचे पती दीर्घकाळापासून संघ परिवाराशी जोडलेले आहेत.

वनाथी श्रीनिवासन यांनी अभिनेते कमल हसन यांचा पराभव केला

संसदीय मंडळाशिवाय भाजपने आपली निवडणूक समितीही जाहीर केली आहे. सुधा यादव यांच्याशिवाय आणखी एका महिला नेत्या वनाथी श्रीनिवासन यांचा या संघात समावेश करण्यात आला आहे. वकिलीत आपला ठसा उमटवून राजकारणात प्रवेश केलेल्या वनाथी श्रीनिवासन यांनी गेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सिनेसृष्टीतील सुपरस्टार कमल हासन यांच्यावर निशाणा साधला होता. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून सध्या कार्यरत असलेल्या वनाथी या तामिळनाडूतील केवळ ४ भाजप आमदारांपैकी एकमेव महिला आमदार आहेत.

वनाथी यांनी महिला व ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या लिंग चाचणीविरोधात लढा दिला

2014 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि 2020 मध्ये महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी विराजमान झालेल्या वनाथी श्रीनिवासन यांनी महिला आणि ट्रान्सजेंडर्सच्या हक्कांसाठी नेहमीच आवाज उठवला आहे. महिला खेळाडू आणि ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या लिंग चाचणीच्या विरोधात लढा दिला. भाजपमध्ये असताना 2014 मध्ये त्यांनी LGBTQ वर लिहिलेले पुस्तकही लाँच केले. ही एक मोठी घटना होती, कारण तेव्हा भाजपने उघडपणे समलैंगिकतेला विरोध केला होता. यावर वनाथी म्हणाल्या की, वकील म्हणून मला कोणतीही गोष्ट मनात ठेवायची नाही.

बातम्या आणखी आहेत...