आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र सरकारसह भाजपशासित राज्यांना मोठ्या टीकेचा सामना करावा लागत आहे. आता या खराब झालेल्या इमेजला सुधारण्यासाठी BJP ने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्ग भाजपने 'सेवा हीच संघटना' नावाचे अभियान सुरू केले आहे. पक्षाध्यक्ष जेपी नड्डांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात कार्यकर्त्यांना लसीकरण प्रोग्राममध्ये भाग घेण्यास सांगितले आहे.
सेवा हीच संघटना प्रोग्राम फेज-2
नड्डांनी कार्यकर्त्यांना म्हटले की, लसीकरण मोहिमे व्यतिरिक्त, मदत कार्यात आणि खेड्यांमधील स्वयंसेवक आरोग्य सेवेच्या प्रशिक्षणात भाग घ्या. यात 45 पेक्षा जास्त वय असलेल्या सर्वांना लस कशाप्रकारे देता येईल, हे ठरवावे. 18-44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणावरही फोकस करा आणि ज्यांना संक्रमणाचा जास्त धोका असेल, त्यांना लसीकरणात प्राथमिकता द्या. सामानांची डिलीव्हरी करणारे, ऑटो रिक्शा ड्रायवर, घरांमध्ये काम करणारे, न्यूज पेपर वाटप करणारे, गॅस सिलेंडर्सची डिलीव्हरी कराणारे, इत्यादींना लसीकरणासाठी जागरुक करा. ब्लड डोनेशन कँप आयोजित करा आणि गरजवंतांना आणि हॉस्पिटलमधील रुग्णांना जेवणाची सोय करा.
इमेज सुधारण्यासाठी आतापर्यंत 3 गोष्टी केल्या
पहिली: दुसर्या लाटेत जेव्हा केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारवर गैरव्यवस्थेचा आरोप केला गेला, तेव्हा भाजपाने कोरोनाविरूद्ध मोहिमेमध्ये कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचे निर्देश दिले. मोदींचे 7 वर्षे पंतप्रधान म्हणून पूर्ण झाल्याचा मोठा कार्यक्रम झाला नाही.
दुसरी: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 18 जूनला देशाला संदेश दिला. 18+चे लसीकरण मोफत करण्याची घोषणा केली.
तिसरी: भाजपने सेवा हिच संघटन अभियानाचा दुसरा टप्पा सुरू केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.