आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Preparing To Set Foot In The South; Regional Parties United, Taluka Office, Booth Level Organization, Local Faces|Marathi News

राजकीय मोर्चेबांधणीला वेग:दक्षिणेत भाजप पाय रोवण्याच्या तयारीत; प्रादेशिक पक्ष एकवटले, तालुका कार्यालय, बूथ स्तरावर संघटन, स्थानिक चेहऱ्यांना वाव

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सार्वत्रिक निवडणुकीला आणखी दोन वर्षे शिल्लक असली तरी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. दिल्लीत द्रमुक कार्यालयाच्या उद्‌घाटनानिमित्त एकवटलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांकडे २०२४ च्या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून पाहिले जात आहे. ईशान्य आणि उत्तरेत नुकत्याच झालेल्या विजयामुळे भाजप दक्षिण भारतात वेगाने पाय रोवण्याच्या प्रयत्नात आहे. दक्षिणेतील पाच राज्यांत लोकसभेच्या १२९ जागा आहेत. यात २५ कर्नाटकातील असून या भाजपसाठी दक्षिणेतील प्रवेशद्वार आहेत.

तेलंगण भाजपचे प्रभारी आणि पक्षाचे सरचिटणीस तरुण चुघ म्हणाले की, विधानसभेत आमचा एक आमदार आहे.
तेलंगण भाजपचे प्रभारी आणि पक्षाचे सरचिटणीस तरुण चुघ म्हणाले की, विधानसभेत आमचा एक आमदार आहे.

1. हिंदुत्व : कर्नाटकात हिजाब वाद, मुस्लिमांना हिंदू मेळ्यात दुकाने लावण्यापासून रोखणे, हलाल मांस अशा मुद्‌द्यांना महत्त्व दिले जातेय.

2. घराणेशाही : आंध्र, तेलंगण आणि तामिळनाडूत राजकारण केवळ दोन पक्षांत मर्यादित आहे. या पक्षांचे नेतृत्व निवडक कुटुंबांकडे आहे. भाजप हा मोठा मुद्दा बनवत आहे.

3. भ्रष्टाचार : दक्षिणेच्या राज्यांत नेत्यांवर भ्रष्टाचाऱ्याचे आरोप आहेत. त्यांच्याविरुद्ध भाजप भ्रष्टाचारमुक्त छबी सादर करत आहे.

4. डबल इंजिन : ज्या राज्यांत भाजप सरकार आहे, तेथे लोकांना केंद्राच्या योजनांचा पूर्ण लाभ मिळत आहे, असे भाजप सांगत आहे. पण दक्षिणेत असे दिसत नाही.

5. नवे चेहरे : बाहरील पक्ष या हेटाळणीपासून वाचण्यासाठी भाजप स्थानिक नेत्यांना पुढे करत आहे. दुसऱ्या पक्षातील मोठे चेहरे भाजपमध्ये आणले जात आहेत.

6. एकला चलो : दक्षिणेतील राज्यांत भलेही भाजपचे काही सहकारी असले तरी पक्ष आपले पाय रोवू पाहत आहे. यातून तो हळूहळू आधार निर्माण करत आहे.

प्रत्येक राज्यासाठी वेगळी रणनीती
तेलंगण: प्रत्येक गावात कमळ चिन्हलोकसभा निवडणुकीत विधानसभेच्या तुलनेत व्होट शेअर १२% वाढला होता. यामुळे उत्साहित पक्षाने मंडळ स्तरापर्यंत कार्यालये थाटली. मंडळ स्तरावर होणाऱ्या पक्षांच्या कार्यक्रमात किमान १०० लोक उपस्थित राहतील याची काळजी घेतली जात आहे. भित्तिलेखनातून प्रत्येक गावापर्यंत कमळ चिन्ह पोहोचवले जात आहे. पुढील सहा महिने प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय नेत्याचा दौरा होईल. विधानसभानिहाय सर्व्हे केला जात आहे. उर्वरित जिंकल्या आहेत. त्यामुळे तेलंगणचे मुख्यमंत्री अन्य राज्यांत फिरत आहेत. भाजप हिंदी भाषिक प्रदेशाचा पक्ष असल्याच्या प्रश्नावर आंध्र प्रदेश भाजपचे सहप्रभारी सुनील देवधर म्हणाले, कधीकाळी हे ईशान्येतही म्हटले जात होते. सध्या संपूर्ण ईशान्येत भाजप आहे. ६ एप्रिल भाजप ४२ वा स्थापना दिन आहे. ७ एप्रिलपासून दक्षिण भारतात मोठे अभियान चालेल. राजकीय विश्लेषक, हर्षवर्धन त्रिपाठी म्हणाले, आतापर्यंत भाजपविरुद्ध हिंदी पट्ट्यातील असल्याचा आरोप लावून द्रविड पक्ष यशस्वी होत राहिले. मात्र, आता लोक राष्ट्रीय पक्षांना संधी देऊ शकतात.

प्रत्येक राज्यासाठी वेगळी रणनीती रणनीति
आंध्र प्रदेश: ४ पट नवे सदस्य जोडले : विधानसभेत भाजपला ०.८४% मते मिळाली होती. आता ३ वर्षांत पक्ष प्रत्येक जिल्हा व मंडळापर्यंत पोहोचला आहे. प्रत्येक तीन-चार बूथवर एक शक्ती केंद्र बनवून तेथे युवा मोर्चा, महिला मोर्चासह सर्व संघटनांची टीम आहे. ८ लाखांवर व्हेरिफाइड सदस्य बनवले. स्थानिक महापुरुषांना समर्पित कार्यक्रम घेतले जात आहे. यामुळे पक्ष बाहेरील असल्याची प्रतिमा पुसून जाईल.

कर्नाटक: हिंदुत्वाचा आक्रमक मुद्दा : लोकसभा निवडणुकीत भाजपने २८ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. मुख्यमंत्री बदलून सत्ताविरोध मोडून काढण्याचा मार्ग निवडला. हिजाब आणि हलाल सारखे मुद्देही पक्षासाठी योग्य ठरले. धर्मांतरण विरोधी बिल, मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याच्या मुद्द्यांवर पक्ष आक्रमक आहे.

तामिळनाडू: मनपा निवडणुकीतून बळ : भाजपने मनपा निवडणूक स्वबळावर लढली.बहुतांश तरुणांना तिकीट दिले. पक्ष बळकट करू शकतील अशा ५००० वर तरुणांना पुढे आणले. या निवडणुकीत भाजपला ५.४% मते मिळाली. तर मागील विधानसभेत २.६२% मते मिळाली होती.

केरळ: संघामार्फत पाय रोवण्याचा प्रयत्न : हे दक्षिणेकडील राज्य अजूनही भाजपसाठी आव्हान ठरले आहे. मोठे चेहरे उतरवूनही पक्षाला यश मिळवता आलेले नाही.

बातम्या आणखी आहेत...