आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • BJP President JP Nadda Alleges That During The UPA Government, The Prime Minister's Aid Fund Was Diverted To The Rajiv Gandhi Foundation.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपाचा गांधी कुटुंबावर आरोप:यूपीए सरकारच्या काळात पंतप्रधान मदत निधीचा पैसा राजीव गांधी फाउंडेशनमध्ये वळवला, ही देशाची फसवणूक आहे, भाजपा अध्यक्ष जे पी नड्डांचा आरोप

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपा अध्यक्ष नड्डा यांनी सलग दुसऱ्या दिवशी साधला गांधी कुटुंबावर निशाणा
  • गुरुवारी म्हटले होते - राजीव गांधी फाउंडेशनला चीनने 90 लाख रुपये दिले होते

कॉंग्रेस-भाजपमध्ये चीनच्या मुद्दय़ावरील चर्चा आता घराणेशाही आणि भ्रष्टाचाराच्या आरोपापर्यंत पोहचली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सलग दुसऱ्या दिवशी गांधी कुटुंबावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, यूपीएच्या काळात पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (पीएमएनआरएफ) चे पैसे राजीव गांधी फाउंडेशनला (आरजीएफ) देण्यात आले होते. सोनिया देखील पीएमएनआरएफच्या मंडळावर होत्या आणि आरजीएफच्या अध्यक्षही होत्या.

'मदत फंडाची रक्कम गरजूंच्या मदतीसाठी होती'
नड्डा म्हणाले, देशातील जनतेने त्यांच्या कष्टाने मिळवलेले पैसे पीएमएनआरएफला दान केले जेणेकरून गरजू लोकांची मदत करता यावी. या फंडाचा निधी कुटुंबाच्या फाउंडेशनमध्ये वळवणे केवळ फ्रॉड नाही तर देशातील लोकांची फसवणूक आहे.

'कॉंग्रेस घराण्याने माफी मागावी'
कुटुंबाच्या संपत्तीसाठी असलेल्या लालसेमुळे देशाचे मोठे नुकसान झाले असल्याचे नड्डा यांनी म्हटले आहे. कॉंग्रेस घराण्याने स्वतःच्या फायद्यासाठी केलेल्या लूटमारीबद्दल माफी मागायला हवी. 

यापूर्वी गुरुवारी भाजप अध्यक्ष म्हणाले होते की, 2005-06 मध्ये राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून 3 लाख डॉलर (तेव्हाचे 90 लाख) रुपये मिळाले होते. त्या बदल्यात, फाऊंडेशनने चीनबरोबर मुक्त व्यापारास प्रोत्साहन देणारा अभ्यास केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यासह राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि पी. चिदंबरम हे विश्वस्त असूनही फाउंडेशनच्या अध्यक्षा सोनिया गांधी आहेत.  काँग्रेसने प्रत्युत्तर देताना म्हटले होते की, सरकारने 2005 मध्ये जगणे थांबवावे आणि 2020 प्रश्नांची उत्तरे द्यावी. 

बातम्या आणखी आहेत...