आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP President JP Nadda On Rahul Gandhi And Medha Patakar, Latest News And Update

राहुल गांधी -मेधा पाटकर गुजरातविरोधी:भाजपध्यक्ष जे पी नड्डा यांची टीका; म्हणाले -भाजप विजयाचे सर्वच विक्रम मोडेल

सुरत7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी दंड थोपटलेत. भाजप अध्यक्ष जे पी नड्डाही बुधवारी गुजरातला पोहोचले. त्यांनी सुरतमधील प्रचारसभेत राहुल गांधींवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले - मेधा पाटकरांनी विकासाला नेहमीच विरोध दर्शवला. आता त्यांच्या बाजूला राहुल गांधी उभे आहेत. याचा अर्थ दोघेही गुजरातविरोधी आहेत.

मेधा पाटकर यांनी काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला होता. त्यांनी नर्मदा बचाओ आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांचा नर्मदा धरण प्रकल्पालाही कडवा विरोध होता. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारीच त्यांच्यावर निशाणा साधला होता. आता नड्डा यांनीही त्यांच्यावर तोंडसूख घेतले आहे.

आम आदमी पार्टीवर कडाडले नड्डा

जे पी नड्डा यांनी प्रचारसभेत आम आदमी पार्टीवरही निशाणा साधला. नड्डा म्हणाले, मनीष सिसोदिया यांना लाज वाटली पाहिजे. सत्येंद्र जैन आजाराच्या नावाखाली एका बलात्काऱ्याकडून मसाज करवून घेत आहेत. त्यांना आतापर्यंत जामीन का मिळाला नाही? त्यांच्याकडे वकील नाहीत काय? त्यांच्यावर गंभीर आरोप असल्यामुळेच त्यांना जामीन मिळत नाही हे खरे कारण आहे.

भाजप अध्यक्ष म्हणाले की, यंदा भाजप आपल्या विजयाचे सर्वच विक्रम मोडीत काढेल. गुजरातमध्ये सर्वच क्षेत्रांत विकास होत आहे. यामुळेच लोक आमच्यावर पुन्हा विश्वास दाखवतील.

1 व 5 डिसेंबर रोजी होईल मतदान

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबर रोजी होईल. तर दुसऱ्या टप्प्याची निवडणूक 5 डिसेंबरला होईल. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. पहिल्या टप्प्यातील व्होटिंग प्रक्रियेसाठी 5 नोव्हेंबर, तर दुसऱ्या टप्प्यातील व्होटिंग प्रक्रियेसाठी 10 नोव्हेंबर रोजी गॅझेट नोटिफिकेशन जारी झाले होते.

गुजरातमध्ये 24 वर्षांपासून भाजप सत्तेत

मागील 24 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे. येथे प्रत्येक निवडणुकीत काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष राहिला. पण यावेळी आम आदमी पार्टीची एंट्री झाली. यामुळे समीकरण बदलण्याची चिन्हे आहेत. पंजाब निवडणूक जिंकल्यामुळे आपने गुजरातमध्ये आपली पूर्ण ताकद लावली आहे. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...