आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी रविवारी राहुल गांधींच्या भाषणाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओत राहुल शेतकऱ्यांची दलालांपासून सुटका करण्याची आणि आपले उत्पन्न थेट कंपन्यांना विकण्याची वकिली करत आहेत. यावरून नड्डा यांनी राहुल गांधीवर शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली राजकारण केल्याचा आरोप केला.
राहुल गांधी शेतकरी आंदोलनाद्वारे सतत मोदी सरकारला घेराव घालण्याचा प्रयत्न करत आहेत. तीन नवीन कृषी कायदे शेतकरी विरोधी असल्याचे ते प्रत्येक व्यासपीठावरून सांगत आहेत. नवीन कायद्यांनुसार शेतकरी बाजारपेठेत कोठेही पिके थेट विकू शकतात. त्याला उत्तर म्हणून जे.पी.नड्डा यांनी व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, "राहुल गांधी ही काय जादू होत आहे? आधी आपण ज्याची वकिली करत होतात, आता त्याचाच विरोध करत आहात."
ये क्या जादू हो रहा है राहुल जी?
— Jagat Prakash Nadda (@JPNadda) December 27, 2020
पहले आप जिस चीज़ की वकालत कर रहे थे, अब उसका ही विरोध कर रहे है।
देश हित, किसान हित से आपका कुछ
लेना-देना नही है।आपको सिर्फ़ राजनीति करनी है।लेकिन आपका दुर्भाग्य है कि अब आपका पाखंड नही चलेगा। देश की जनता और किसान आपका दोहरा चरित्र जान चुके है। pic.twitter.com/Uu2mDfBuIT
राहुल गांधींच्या व्हिडिओमध्ये काय आहे?
राहुल गांधींचा हा व्हिडिओ बराच जुना आहे. लोकसभेत ते म्हणाले होते की, काही वर्षांपूर्वी मी युपीच्या दौऱ्यावर होतो. एका शेतकऱ्यांने मला विचारले की, राहुलजी आम्ही दोन रुपये किलोने बटाटे विकतो. पण आमचे मुले चिप्स खरेदी करतात तेव्हा 10 रुपयचे एक पाकिट येते. त्यात एकच बटाट असते. त्यामुळे ही काय जादू होत आहे असे शेतकऱ्याने मला विचारले. मी शेतकऱ्यांना याचे कारण विचारले.
ते म्हणाले की, राहुल जी कारखाने आमच्यापासून दूर आहेत. जर आम्ही आमचा माल थेट कारखान्यात विकू शकलो तर मध्यस्थांना फायदा होणार नाही आणि आम्हाला सर्व पैसे मिळतील. फूड पार्कमागची ही विचारसरणी होती. त्यानंतर राहुल यांनी मोदी सरकारवर अमेठीचा फूड पार्क प्रकल्प रखडल्याचा आरोप केला होता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.