आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP President JP Nadda Says Citizenship Act Delayed Due To Covid , This Act Will Be Implemented Soon

CAA वर भाजपचे मोठे विधान:भाजपाध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले- कोविड महामारीमुळे नागरिकत्व कायद्याला उशीर झाला, लवकर हा कायदा लागू केला जाईल

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना आजारामुळे नागरिकत्व दुरुस्ती कायद्यात (सीएए) उशीर झाल्याचे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सोमवारी सांगितले. लवकरच याची अंमलबजावणी केली जाईल, असेही ते म्हणाले. नड्डा उत्तर बंगालमधील एका सोशल ग्रुपशी बोलत होते.

ममता बॅनर्जी सरकार पश्चिम बंगालमध्ये फोडा आणि राज्य करा, हे धोरण चालवित असल्याचा आरोप नड्डा यांनी केला. ममता यांच्या पक्षाचा हेतू पूर्ण करण्यासाठी इथले सरकार काम करत आहे. तर दुसरीकडे भाजप सरकार सर्वांच्या विकासासाठी काम करत आहे, असेही नड्डा यावेळी म्हणाले.

कोरोना परिस्थिती सुधारत आहे-नड्डा

नड्डा पुढे म्हणाले की, सर्व नागरिकांना लवकरच नागरिकत्व बिलाचा लाभ मिळेल. आम्ही यासाठी वचनबद्ध आहोत. हे विधेयक आता संसदेने मंजूर झाले आहे. कोविड महामारीमुळे याच्या अंमलबजावणीस उशीर झाला. पण आता गोष्टी हळू हळू सुधारत आहेत. आता नागरिकत्व कायद्यावर काम सुरू झाले आहे आणि नियम बनवले जात आहेत. लवकरच याची अंमलबजावणी होईल.

‘बंगालमध्ये भाजपचे सरकार येईल’

नड्डा यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला की, 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बंगालमध्ये भाजपचे सरकार येईल. राज्यातील लोक येथील तृणमूल सरकारची हिंसा आणि कट-मनी कल्चरने त्रस्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...