आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • BJP Rath Yatras West Bengal Update; BJP National President JP Nadda Criticized On Mamata Banerjee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगालमध्ये राजकीय वातावरण तापले:बंगाल पूर्व पाकिस्तानात जात होते, श्यामा प्रसाद मुखर्जींनी याला वाचवले : भाजप अध्यक्ष नवद्वीपमध्ये नड्डा

कोलकाता3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ही विवेकानंदजी आणि रविंद्रनाथ टागोरांची भूमी, येथील संस्कृती ममताजी सांभाळू शकत नाही

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगले तापले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा शुक्रवारी राज्यात राज्यात दोन कार्यक्रमांत सहभागी झाले होते. पहिला कार्यक्रम माल्दा आणि दुसरा नादियातील नवद्वीपमध्ये झाला. जेपी नड्डा यांनी नवद्वीपमध्ये भाजपच्या परिवर्तन यात्रेला हिरवा कंदील दाखवला. यावेळी ते म्हणाले की, नेहरूंच्या काळात बंगाल पूर्व पाकिस्तानात जात होता. पाकिस्तानचे दोन तुकडे झाल्यानंतर श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी बंगालला वाचवण्याचे काम केले.

नड्डा यांनी आपल्या भाषणात म्हटले की, 'मोदींनी बंगामध्ये दरवेळेस सर्वकाही देण्याचा प्रयत्न केला. मात्र ममता यांनी नेहमीच नकारात्मक प्रतिसाद दिला. ममताजी जातील, रस्त्यातील अडथळा दूर होईल आणि बंगालच्या जनतेला आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळेल. ममताजी गेल्यानंतर 70 लाख शेतकऱ्यांना सम्मान निधी मिळेल. प्रत्येक शेतकऱ्याला 14 हजार रुपये मिळतील. हेच ते परिवर्तन आहे ज्याबाद्दल आम्ही बोलत आहे.'

मताजी संस्कृतीचे रक्षण करू शकत नाही

नड्डा म्हणाले की, ममता संस्कृती रक्षणाच्या गोष्टी करतात. ही विवेकानंदजी आणि रविंद्रनाथ टागोरांची भूमी आहे. ममताजी येथील संस्कृती सांभाळू शकत नाहीत. त्याचे रक्षण भाजपचेच लोक करतील. तुम्ही माझ्या नावामागे एक विशेषण लावले होते. तेच सांगते की, तुमची स्वतःची संस्कृती काय आहे.

बातम्या आणखी आहेत...