आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चीनवर काँग्रेस-भाजप:चीनने राजीव गांधी फाउंडेशनला डोनेशन दिले, कोणत्या अटींवर पैसे दिले हे काँग्रेसने सांगावे- रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पूर्व लद्दाखच्या गलवान घाटीवर भारत आणि चीनमध्ये झालेल्या हिंसच चकमकीनंतर भाजपवर निशाना साधणाऱ्या काँग्रेसवर भाजपने पलटवार करणे सुरू केले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी आरोप लावला की, राजीव गांधी फाउंडेशनला चीनने 2005-06 मध्ये तीन लाख डॉलर (अंदाजे 2 कोटी 26 लाख रुपये) डोनेशन दिले होते. काँग्रेसने सांगावे की, त्यांनी हे पैसे कोणत्या अटींवर घेतले आणि त्या पैशांचे केले काय ? 

रविशंकर प्रसाद म्हणाले की, काँग्रेसच्या कार्यकाळात चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केला. काँग्रेसने सांगावे की, राजीव गांधी फाउंडेशनला हे रुपये चीनसोबत फ्री ट्रेड अॅग्रीमेंट (एफटीए) म्हणजेच, कोणत्याही अडथळ्याविना आयात-निर्यातीसाठी मिळाले आहेत. त्यांनी सांगावे की, जेव्हा डोनेशन देण्याची सुरुवात झाली, तेव्हा राजीव गांधी फाउंडेशनने अनेक स्टडीजचा हवाला देत भारत आणि चीनमध्ये एफटीए किती गरजेचे आहे, हे पटवून दिले.

राजीव गांधी फाउंडेशनला पॉलिटिकल असोसिएशन म्हटले

केंद्रीय कायदे मंत्र्यांनी सांगितले की, फॉरेन कांट्रीब्यूशन रेगुलेशन अॅक्टअंतर्गत कोणताही राजकीय पक्ष परदेशातून पैसे घेऊ शकत नाही. तसेच, कोणतीच एनजीओ सरकारच्या परवानगीशिवाय पैसे घेऊ शकत नाही. काँग्रेसने सांगावे की, या डोनेशनसाठी सरकारकडून परवानगी घेतली होती का ? त्यांनी आरोप लावला की, राजीव गांधी फाउंडेशन एजुकेशन अँड कल्चरल बॉडी नसून, एक पॉलिटिकल असोसिएशन आहे.

सोनिया गांधी फाउंडेशनच्या चेअरपर्सन आहेत

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राजीव गांधी फाउंडेशनच्या चेअरपर्सन आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अर्थ मंत्री पी चिदंबरम आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी बोर्डाच्या सदस्या आहेत.

डोकलाम वादात राहुल यांनी चीनच्या अॅम्बेसडरसोबत गुपचूक चर्चा केली होती: नड्‌डा

भाजप अध्यक्ष जेपी नड्‌डा यांनी मध्य प्रदेशमध्ये जनसंवाद रॅलीत काँग्रेसवर गंभीर आरोप लावले. त्यांनी म्हटले की, डोकलाम वादादरम्यान राहुल गांधींनी चीनच्या अॅम्बेसडरसोबत गुपचूक चर्चा केली. 

बातम्या आणखी आहेत...