आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Ready To Tie Up With JDS For Mission Karnataka; BJP Wants To Get Closer To The Voters

दक्षिण मार्ग:मिशन कर्नाटकसाठी जेडीएसशी युती करण्याच्या तयारीत भाजप ; मतदारांची जवळीक साधू इच्छितो भाजप

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमध्ये पुढील वर्षी एप्रिलमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने नव्या आघाडीची शक्यता तपासणे सुरू केले आहे. या अंतर्गत पक्ष वैचारिकदृष्ट्या विरोधक जेडीएसशी आघाडी करण्याची तयारी करत आहे. असे करून तो जुन्या म्हैसूर क्षेत्रातील(वोक्कालिग्गा बाहुल्य) ८९ जागांवर पकड तयार करू इच्छित आहे. २२४ विधानसभा जागांच्या कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेसाठी ११३ आमदार लागतात. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०४ जागा मिळाल्या होत्या. यापैकी जुन्या म्हैसूर भागात ८९ पैकी केवळ २२ जागा जिंकता आल्या. काँग्रेसने ३२ आणि जेडीएसने ३१ जागा जिंकल्या होत्या. हा भाग माजी पंतप्रधान आणि जेडीएस प्रमुख एचडी देवेगौडा यांचे गृहक्षेत्र आहे. तेथे जेडीएस आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होते. १०० पेक्षा जास्त जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष झाल्यानंतरही भाजप सरकार बनवू शकली नाही. तेव्हा जेडीएसने काँग्रेसला विनाशर्त पाठिंबा दिला होता.सूत्रांनुसार, भाजप राज्यात या क्षेत्रात आपल्या कमकुवतपणावर सर्वांचे लक्ष आकर्षित करू इच्छिते. यातून जुन्या म्हैसूर भागातील ८०% जास्त जागा जिंकता येऊ शकतील.

भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीतील एक मोठा फॅक्टर भावना आहे. विशेषत: स्थानिक नेत्यांवरून लोकांच्या भावनांवर परिणाम होतो. २००९ मध्ये जेडीएसने भाजप, विशेषत: येदियुरप्पांना अडीच-अडीच वर्षे सीएमच्या सूत्राुनसार पाठिंबा दिला नव्हता आणि त्यामुळे सरकार कोसळले होते. त्यानंतर भाजप निवडणूक जिंकला. यानंतर येदियुरप्पा भाजपतून विभक्त झाल्यावर भाजप हरला. गेल्या निवडणुकीत येदियुरप्पांचे वय ७६ असतानाही त्यांना सीएम पदासाठी प्रोजेक्ट करावे लागले. लिंगायत मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपला हा निर्णय घ्यावा लागल्याचे सूत्रांनी सांगितले. कारण,भाजपमध्ये येदियुरप्पांएवढा मोठा लिंगायत नेता नाही.

राज्यात लिंगायत, वोक्कालिगाची ३०% मते वाढली लिंगायत, वोक्कालिगा प्रभावी समाज आहे. जेडीएससोबत भाजपने हातमिळवणी केल्यास याचा राज्यातील ३०% मतदारांवर परिणाम होऊ शकतो.

समाजमत दलित(एससी) 19% मुस्लिम 16% लिंगायत 18% वोक्कालिगा 11% समाजमत कुरुबा 7% ब्राह्मण 3% ख्रिश्चन 3% (*स्थिती 2019 ची)

असे मिळाली २०१८ मध्ये मते पक्ष मते % वृद्धी/घट जागा भाजप 36.2 +16.3 104 काँग्रेस 38.0 +1.4 78 जेडीएस 18.3 -1.9 37

बातम्या आणखी आहेत...