आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाँग्रेस आणि भाजपदरम्यान सोशल मीडियावर व्हिडिओ वॉर सुरू झाले आहे. काँग्रेस अदानी प्रकरणावरून आणि राहुल गांधींच्या सदस्यत्वावरून भाजपविरोधात प्रश्नांच्या मालिकेसह डेमोक्रेसी डिस्क्वॉलिफायइड कॅम्पेन चावलत आहे.
तर भाजपनेही घोटाळे-भ्रष्टाचारावरून सोशल मीडियावर काँग्रेस फाईल्स नावाने व्हिडिओ सीरिज सुरू केली आहे. भाजपने ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या या व्हिडिओसह लिहिले आहे - काँग्रेस फाईल्सच्या पहिल्या एपिसोडमध्ये बघा, काँग्रेसच्या राजवटीत कसे एकामागोमाग एक भ्रष्टाचार आणि घोटाळे झाले...
आता बघा या व्हिडिओत काय आहे
तीन मिनिटांच्या या व्हिडिओची सुरूवात होते काँग्रेसचा अर्थ समजावून सांगताना. यात लिहिले आहे - काँग्रेस म्हणजेच भ्रष्टाचार. या व्हिडिओत काँग्रेसच्या 70 वर्षांतील शासन काळातील घोटाळ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. यात कोळसा घोटाळा, 2G स्पेक्ट्रम, कॉमन्वेल्थ घोटाळ्याचा उल्लेख केला आहे. अखेरच्या मिनिटात नॅरेटर म्हणतो - काँग्रेसच्या घोटाळ्यांची ही तर केवळ झांकी आहे, पिक्चर अजून बाकी आहे.
भाजपने सांगितले, जितके घोटाळे केले, त्या पैशांतून काय-काय होऊ शकत होते
या व्हिडिओत सांगितले आहे की काँग्रेसच्या 70 वर्षांच्या शासन कालखंडादरम्यान 4.82 लाख कोटींचे घोटाळे झाले. जर या पैशांचा योग्य वापर झाला असता तर यातून 24 आयएनएस विक्रांत बनवता आले असते, 300 राफेल जेट खरेदी करता आले असते आणि 1000 मंगळ मोहिमा पूर्ण झाल्या असत्या. भाजपने काँग्रेसच्या 2004 ते 2014 या कार्यकाळास हरवलेले दशक म्हटले आहे. कारण त्या कालखंडात वृत्तपत्रांची पाने भ्रष्टाचाराच्या बातम्यांनी भरलेली असायची. ज्या पाहून भारतीयांची मान शरमेने खाली झुकायची.
काँग्रेस राबवत आहे डेमोक्रेसी डिस्क्वालिफाइड सीरिज
यापूर्वी काँग्रेसनेही अदानी मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करत 'हम अदानी के है कौन' मोहिमेअंतर्गत प्रश्नांचे अनेक सेट रिलीज केले होते. याला डेमोक्रेसी डिस्क्वालिफाइड नाव देण्यात आले होते. यानुसार, एएम सिंघवी, जितेंद्र सिंह, शक्ती सिंह गोहिल, अलका लांबा, राजीव शुक्ला व्हिडिओच्या माध्यमातून मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित करताना दिसले होते.
ही बातमीही वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.