आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Release The List Of Candidates For Upcoming Election In West Bengal, Tamilnadu, Kerala, Asam,

भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर:बंगालमध्ये बाबुल सुप्रियो टॉलीगंजमधून, तर मेट्रोमॅन ई श्रीधरन केरळच्या पलक्कडमधून निवडणुकीच्या मैदानात

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तमिळनाडुत 20 जागांवर भाजप लढणार

भाजपने रविवारी पश्चिम बंगालच्या तिसऱ्या टप्प्यातील 31 पैकी 27 आणि चौथ्या टप्प्यातील 44 पैकी 36 उमेदवारांची घोषणा केली आहे. उमेदवारांच्या नावांची घोषणा करताना भाजप नेते अरुण सिंह यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. सुप्रियो यांना बंगालमधील टॉलीगंजमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय, अभिनेता यशदास गुप्ताला चंडीतलामधून निवडणुकीच्या मैदानात उतरवण्यात आले आहे.

अरुण सिंह यांनी पुढे सांगितले की, भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांना चुंचुरामधून तिकीट मिळाले आहे. तर, तृणमूल सोडून भाजपत आलेल्या राजीव बॅनर्जींनाही भाजपने तिकीट दिले आहे. अर्थशास्त्री अशोक लहरी अलीपुरदौर, राजीव बॅनर्जी दोमजुर आणि रविंद्रनाथ भट्टाचार्य सिंगुरमधून भाजपचे उमेदवार असतील.

खासदार स्वप्नदास आणि निशिथ यांनाही उमेदवारी

भाजपने खासदार स्वप्नदास गुप्ता यांना तारुकेश्वर आणि खासदार निशिथ प्रमाणिक यांना डिंहाटामधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय, अंजना बासु सोनारपूर साउथ, पायल सरकार बेहाला ईस्ट आणि अशोक लाहिरींना अलीपुरद्वारमधून उमेदवारी मिळाली आहे.

पश्चिम बंगालमधील तिसऱ्या टप्प्यातील 27 उमेदवार

तमिळनाडुत 20 जागांवर भाजप लढणार

भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी पुढे सांगितले की, तमिळनाडुमध्ये भाजप एनडीएची सहयोगी अन्नाद्रमुकसोबत निवडणुकीत उतरत आहे. यांदाच्या निवडणुकीत भाजप तमिळनाडूत 20 जागा लढवत असून, प्रदेशाध्यक्ष एल मुरुगन धारापुरममधून निवडणूक लढवत आहेत. याशिवाय, पक्षाचे जेष्ठ नेते एच राजा, कराईकुडीमधून मैदानात आहेत.

मेट्रोमॅन ई श्रीधरन यांना पलक्कडची उमेदवारी

केरळमध्ये भाजप 115 जागा लढवणार असून, 25 जागा इतर 4 पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत. मेट्रोमॅन ई श्रीधरन पलक्कडमधून निवडणूक लढवणार आहेत. तर, केरळचे माजी प्रदेशाध्यक्ष कुम्मनम राजशेखरन नेमोममधून मैदानात आहेत. याशिवाय, केजे अलफांस कंजीरापल्लीमधून, सुरेश गोपी त्रिशुरमधून, डॉ अब्दुल सलाम त्रिरूरमधून आणि माजी DGP जैकेब इरींजलाकुडामधून भाजपचे उमेदवार असतील.

आसाममध्ये भाजप 92 जागा लढवणार

भाजपने आसामसाठी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. राज्यात भाजप 92 जागा लढवणार असून, इतर जागा सहयोगी पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...