आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Released Congress Files Second Episode; MF Hussain Painting | Rahul Gandhi | Sonia Gandhi

भाजपने रिलीज केला काँग्रेस फाइल्सचा दुसरा भाग:व्हिडिओत आरोप- पेंटिंगमधून 2 कोटी कमावले, हे पैसे सोनियांच्या उपचारांवर खर्च केले

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस फाइल्सच्या दुसऱ्या एपिसोडचा व्हिडिओ भाजपने ट्विटरवर शेअर केला आहे. - Divya Marathi
काँग्रेस फाइल्सच्या दुसऱ्या एपिसोडचा व्हिडिओ भाजपने ट्विटरवर शेअर केला आहे.

भारतीय जनता पक्षाने काँग्रेस फाइल्सचा दुसरा भाग प्रसिद्ध केला आहे. सोमवारी त्यांच्या ट्विटर हँडलवर पोस्ट केलेल्या या व्हिडिओमध्ये एमएफ हुसैन यांच्या पेंटिंगच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आरोप करण्यात आले आहेत. ही पेटिंग येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी प्रियंका गांधींकडून 2 कोटींना विकत घेतली होती.

या व्हिडिओमध्ये निवेदक काही फोटोंसह म्हणत आहे की, राणा कपूरला प्रियांका गांधींकडून 2 कोटींना पेंटिंग विकत घ्यायला लावण्यात आली होती. हे पैसे सोनिया गांधी यांच्या उपचारासाठी वापरण्यात आल्याचेही या व्हिडिओमध्ये सांगण्यात आले आहे.

या व्हिडिओमध्ये काय सांगितले आणि दाखवले आहे ते वाचा

  • दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानसारख्या देशांचा केस स्टडी करणारी FATF आता गांधी कुटुंबाच्या भ्रष्टाचाराचा केस स्टडी करत आहे.
  • येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांनी ईडीसमोर खुलासा केला आहे की, त्यांना प्रियांका गांधींकडून 2 कोटी रुपयांना एक पेंटिंग खरेदी करण्यास भाग पाडण्यात आले होते.
  • राणा यांनी प्रियांका गांधी यांना 2 कोटींच्या चेकद्वारे पैसे दिले होते. या चेकचा फोटोही व्हिडिओमध्ये शेअर करण्यात आला आहे.
  • तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी राणा यांनी हे पेंटिंग विकत न घेतल्यास त्यांचे गांधी कुटुंबाशी असलेले संबंध बिघडतील, असा इशारा दिला होता.
  • 1 मे 2010 रोजी यूपीए सरकारमधील मंत्री मिलिंद देवरा यांनी राणा कपूर यांना पत्र लिहून पेंटिंग विकत घेण्यासाठी दबाव आणला होता.
  • गांधी परिवाराच्या वतीने अहमद पटेल यांनी राणा यांना पद्मभूषण देण्याचे आश्वासन दिले होते, कारण राणा यांनी गांधी कुटुंबाला मदत करून चांगले काम केले होते.

काँग्रेसच्या फाइल्सच्या पहिल्या व्हिडिओमध्ये काय होते?

तीन मिनिटांच्या पहिल्या एपिसोडचा व्हिडिओ काँग्रेसचा अर्थ सांगून सुरू होतो. ज्यामध्ये लिहिले आहे- काँग्रेस म्हणजे करप्शन. या व्हिडिओमध्ये निवेदकांनी काँग्रेसच्या 70 वर्षांच्या कारकिर्दीतील घोटाळ्यांचा उल्लेख केला आहे. त्यात कोळसा घोटाळा, टूजी स्पेक्ट्रम, कॉमनवेल्थ घोटाळा यांचा उल्लेख आहे. शेवटच्या क्षणी निवेदक म्हणतो – ही फक्त काँग्रेसच्या घोटाळ्यांची एक झलक आहे, पिक्चर अभी बाकी है.

काँग्रेसची डेमोक्रसी डिसक्वालिफाइड सिरीज

यापूर्वी, काँग्रेसनेही अदानी मुद्द्यावरून भाजपवर हल्ला चढवला होता आणि 'हम अदानी के हैं कौन' या मोहिमेअंतर्गत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. ज्याला Democracy Disqualified असे नाव देण्यात आले आहे. याअंतर्गत एएम सिंघवी, जितेंद्र सिंह, शक्ती सिंह गोहिल, अलका लांबा, राजीव शुक्ला हे व्हिडिओद्वारे मोदी सरकारवर प्रश्न उपस्थित करताना दिसले.