आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुक-व्हॉट्सअॅपवर काँग्रेस vs भाजप:फेसबुक आणि व्हॉट्सअपवर भाजप-आरएसएसचे कंट्रोल-राहुल गांधींचा आरोप

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसने रविवारी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवरुन भाजप-आरएसएसवर जोरदार टीका केली. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी मीडिया रिपोर्टसोबत ट्वीट केले की, 'भाजप आणि आरएसएस देशात फेसबुक आणि व्हॉट्सअॅपला कंट्रोल करत आहे. सोशल मीडियाद्वारे मतदारांना आकर्षित करण्यासाठी फेक न्यूज पसरवल्या. अमेरिकन मीडिया सत्यासोबत समोर आला आहे.'

भाजपाचे प्रतुत्तर

राहुल यांच्या वक्तव्यावर भाजपनेही प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, निवडणुकीपूर्वी डेटाला शस्त्र बनवण्यासाठी कॅम्ब्रिज अॅनालिटिका आणि फेसबुकशी संगनमद केल्याप्रकरणी काँग्रेसला पकडण्यात आल होते आणि तुम्ही भाजपवर खोटे आरोप लावत आहात. हरलेले लोक इतरांना प्रभावित करण्यासाठी संपूर्ण जग भाजप आणि आरएसएसच्या कंट्रोलमध्ये असल्याचे म्हणू शकतात.

पंतप्रधानांना कशाची भीती: काँग्रेस

यापूर्वी पंतप्रधान मोदींवर निशाना साधण्यासाठी काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले होते की, आम्हाला आमच्या सशस्त्र दलावर पूर्ण विश्वास आहे. काँग्रेससह 130 कोटी नागरिकांना सैन्याच्या शौर्यावर गर्व आहे, पण पंतप्रधान आपल्या भाषणात चीनचे नाव घेण्यास का घाबरत आहेत ?

पंतप्रधानांवर राहुल यांनी आरोप लावले

राहुल गांधींनी रविवारी पंतप्रधानांवर मोठा निशाना साधला. त्यांनी ट्वीट केले की, सर्वांना सैन्याची वीरता आणि क्षमतेवर पूर्ण विश्वास आहे, पंतप्रधानांना नाही. त्यांच्या भीत्रेपणामुळे चीनने आपली जमीन बळकावली आहे.

बातम्या आणखी आहेत...