आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • BJP Sarpanch Killed By Terrorists In Kulgam; The Second Incident Of An Attack On A Party Leader In 48 Hours

काश्मीरमध्ये भाजप नेते निशाण्यावर:कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी भाजप सरपंचांची केली हत्या; 48 तासात पक्षाच्या नेत्यावरील हल्ल्याची दुसरी घटना

कुलगामएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवारचा हा फोटो श्रीनगर महामार्गाचा आहे. तेथे आयईडी सारखे स्फोटक सापडले. - Divya Marathi
मंगळवारचा हा फोटो श्रीनगर महामार्गाचा आहे. तेथे आयईडी सारखे स्फोटक सापडले.
  • कलम 370 हटवण्याच्या वर्षपूर्तीनंतर दहशतवादी सक्रीय

जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील वेस्सू गावचे भाजपचे सरपंच सज्जाद अहमद यांच्यावर दहशतवाद्यांनी गुरुवारी गोळीबार केला. त्यांना पाच गोळ्या लागल्या. सरपंचांना रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांनी सज्जाद यांच्या घराबाहेरच त्यांच्यावर हा हल्ला केला.

कलम 370 हटवण्याच्या वर्षपूर्तीनंतर दहशतवादी सक्रीय

भाजप नेत्यांवरील दहशतवादी हल्ल्याची ही 48 तासांतली दुसरी घटना आहे. 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी दहशतवाद्यांनी भाजपचेच सरपंच आरिफ अहमद यांना कुलगामच्या मीर बाजारात गोळी घातली होती. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवण्याला एक वर्ष पूर्ण झाले. दहशतवादी अशांतता पसरवू शकतात, अशी माहिती श्रीनगर प्रशासनाला मिळाली होती, त्यामुळे श्रीनगर जिल्ह्यात 4 आणि 5 ऑगस्ट रोजी कर्फ्यू लागू करण्यात आला होता.

दहशतवाद्यांनी गेल्या महिन्यात बारामुल्ला जिल्ह्यातील भाजप नेते मिराजुद्दीन मल्लाचे अपहरण केले होते. त्याआधी बांदीपोरा येथे भाजप नेते वसीम बारी, त्यांचे वडील आणि भाऊ यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले होते. वसीम हे बांदीपोरा जिल्ह्याचे भाजप अध्यक्ष देखील होते.

बातम्या आणखी आहेत...