आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीनगर:भाजपचे सरपंच, पत्नीची दहशतवाद्यांकडून हत्या; काश्मीरच्या अनंतनागमधील घटना

श्रीनगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भाजपचे एक सरपंच आणि त्यांच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केली. दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये गुलाम रसूल डार आणि त्यांच्या पत्नीवर गोळीबार केला. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांचे निधन झाले.

गुलाम रसूल डार हे कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी गावचे सरपंच होते. ते कुलगाम जिल्हा भाजप किसान मोर्चाचे अध्यक्षही होते. त्यांनी गेल्या वर्षी जिल्हा विकास परिषदेची निवडणूकही लढवली होती, पण त्यांना विजय मिळू शकला नव्हता. सध्या ते अनंतनागमध्ये भाड्याच्या घरात राहत होते. जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी डार यांच्या हत्येची निंदा करत म्हटले की, ‘ही भ्याड घटना आहे. यासाठी जबाबदार लोकांना लवकरच शिक्षा मिळेल.’

बातम्या आणखी आहेत...