आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काेलकाता:भाजपने अटक करावी, तुरुंगातूनही जिंकून दाखवेन : ममता बॅनर्जी

काेलकाता2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला आव्हान दिले आहे. मला अटक करून दाखवावी. आगामी निवडणुकीत मी तुरुंगातूनही विजयी हाेईन, असे आव्हान ममतांनी दिले आहे. २९४ जागांच्या बंगाल विधानसभेसाठी पुढील वर्षी एप्रिल-मेमध्ये निवडणूक हाेणार आहे. त्यांनी काेविड काळातील पहिली माेठी सभा बांकुडा येथे घेतली. येथेच अलीकडेच गृहमंत्री अमित शहांनी भेट दिली हाेती. या दाैऱ्यात त्यांनी एका आदिवासी कार्यकर्त्याच्या घरी भाेजनही केले हाेते. ममता पुढे म्हणाल्या, राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांनाही तुरुंगात डांबण्यात आले आहे. परंतु त्यांच्या पक्षाला चांगला विजय मिळाला आहे. बिहारमध्ये भाजपचा विजय माेडताेडीचा परिणाम आहे. हा लाेकप्रिय जनादेश नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजप म्हणजे खाेटारडेपणा करणारा पक्ष आहे. देशासाठी शाप आहे. निवडणूक येताच तृणमूल नेत्यांना भीती घालण्यासाठी नारद व शारदा घाेटाळ्याचा मुद्दा मांडला जाताे. परंतु मी भाजप व त्यांच्या एजन्सीला भीत नाही. काही लाेकांना भाजप सत्तेवर येईल, असा भ्रम वाटताे. ते संधी घेण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु भाजपला संधी मिळेल असे दिसत नाही. परंतु आम्ही मात्र माेठ्या जनादेशासाेबत पुन्हा सत्तेवर येऊ, असा विश्वास ममतांनी व्यक्त केला. राज्यात २०११ पासून बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूलचे सरकार आहे. तृणमूल काँग्रेसच्या सत्ता काळात अनेक भाजप कार्यकर्ते, नेत्यांची हत्या झाल्याने राज्यात सत्ताधाऱ्यांविषयी एका गटात असंतोष आहे. त्यामुळे आगामी निवडणूक ममतांना जड जाईल.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser