आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपचे उत्पन्न:भाजपने 2020-21 मध्ये सर्वाधिक 752.34 कोटींचे उत्पन्न दाखवले

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक आयोगाची मान्यता असलेल्या ८ राष्ट्रीय पक्षांनी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये १ हजार ३७३.७८ कोटी रुपयांच्या उत्पन्नाची घोषणा केली आहे. त्यात भाजपने सर्वाधिक ७५२.३४ कोटी रुपयांचे उत्पन्न दाखवले आहे. एकूण सर्व राष्ट्रीय पक्षांच्या एकूण कमाईपैकी ५५ टक्के एवढे आहे. काँग्रेसने २८५.७६ कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले आहे. राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नापैकी २०.८ टक्के आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) याबद्दलचा तपशील जाहीर केला. भाजप, काँग्रेस, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस, भाकप, माकप, तृणमूल काँग्रेस व एनपीपीने उत्पन्नाची माहिती आयोगाकडे जमा केली .

बातम्या आणखी आहेत...